सोनू निगमच्या आवाजातले 'बेटर-हाफची लव्हस्टोरी’ मधील हृदयस्पर्शी गाणं प्रदर्शित

Marathi Movie Song Released: सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या बहुप्रतिक्षित मराठी चित्रपटातील ‘तूच आहे’ हे भावस्पर्शी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, प्रेक्षकांकडून या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या मधुर आणि हृदयाला भिडणाऱ्या आवाजात सादर झालेल्या या गाण्याने अल्पावधीतच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गीतात प्रेम, विरह आणि भावनांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतो. गाण्याचे भावपूर्ण बोल गीतकार संजय अमर यांनी लिहिले असून, ते थेट मनाच्या खोलवर जाऊन भिडतात. तर या गाण्याला साजन पटेल आणि अमेय नरे यांचे संगीत लाभले आहे. हे गाणे सुबोध भावेवर चित्रित करण्यात आले असून, त्यांच्या हृदयस्पर्शी अभिनयाने गाण्याची ताकद अधिकच वाढली आहे.

दिग्दर्शक संजय अमर म्हणतात, '' ‘तूच आहे’ हे प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी जाणवलेली वेदना, ओढ आणि एकटेपणाचा भावनिक प्रवास उलगडणारे गाणे आहे. सुबोध भावे यांचा अभिनय आणि सोनू निगम यांचा आवाज ही या गाण्याची खरी बाजू आहे.”

निर्माते रजत अग्रवाल म्हणतात, “या गाण्यात चित्रपटातील एक महत्त्वाचा भावनिक क्षण सादर केला आहे. त्यातही सोनू निगम यांच्यासारख्या दिग्गज गायकाचा सहभाग आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनी केले आहे. रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या दमदार भूमिका पाहायला मिळतील. विनोद आणि प्रेमाचा अद्वितीय मेळ असलेल्या या सिनेमाचा टिझर आधीच चर्चेत आला होता आणि आता ‘तूच आहे’ गाण्यानेही प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. हा चित्रपट २२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये