ब्रिटनच्या लिव्हरपूलमध्ये अपघात, फुटबॉल विजयी परेडमध्ये घुसली कार, अनेकांना चिरडले

लंडन: ब्रिटनच्या लिव्हरपूल शहरामध्ये सोमवारी भीषण दुर्घटना घडली. येथे प्रीमियर लीगच्या ट्रॉफी विजयाचे सेलीब्रेशन सुरू होते. यावेळी अनियंत्रित झालेल्या कारने या सेलिब्रेशनमध्ये सहभागी असलेल्यांना चिरडले. ही कार या गर्दीत घुसली आणि तिने अनेकांना चिरडले. या दुर्घटनेत कमीत कमी २७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेली व्यक्ती ५३ वर्षीय ब्रिटीश नागरिक आहे. ही व्यक्ती लिव्हरपूलचीच रहिवासी आहे. दरम्यान, पोलीस प्रवक्त्यांनी आवाहन केले आहे की या घटनेच्या परिस्थितीबद्दल कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत. तसेच आम्ही ५३ वर्षीय ब्रिटीश व्यक्तीला या प्रकरणात अटक केली आहे.


पोलिसांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागचे कारण तपासण्यासाठी विस्तृतपणे तपास केला जात आहे. या कारच्या दुर्घटनेत पायी चालत असलेले अनेक जण जखमी झाले होते. जेव्हा या ठिकाणी विजयी यात्रा काढली जात होती त्यावेळेस पायी चालत असलेल्या अनेकांना या कारने उडवले.


 


सोशल मीडियावर एक अनधिकृत व्हिडिओ समोर आला आहे. यात दाखवले आहे की एक कार वेगाने सेलीब्रेशन करत असलेल्या गर्दीच्या दिशेने जात आहे आणि अनेक जण या कारखाली येतात. रिपोर्ट्सनुसार या परेडमध्ये हजारोंच्या संख्येने लोक सामील होते. पोलीस या आधीच कोणत्याही अपघातातबाबत अलर्ट होती. सोबतच चाहत्यांना यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि ड्रोनपासून दूर राहण्यास सांगितले होते.


Comments
Add Comment

Ukraine Russia War : युक्रेनसोबत शांतता करार करण्यासाठी पुतिन यांची तयारी?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी एक महत्त्वपूर्ण संकेत दिला आहे. त्यांनी सांगितले की,

H-1B visa : अमेरिकेत एच-1बी व्हिसाधारकांच्या वेतनात 30% वाढीचा प्रस्ताव; भारतीय व्यावसायिकांवर परिणामाची शक्यता

अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या

Kharg Island : खार्ग बेटाजवळ समुद्रात मोठी तेलगळती? होर्मुझमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात खळबळ

इराणच्या महत्त्वाच्या खार्ग बेटाजवळ समुद्रात मोठ्या प्रमाणावर तेलगळती झाल्याची शक्यता उपग्रह चित्रांमधून

Iran - America War : अमेरिकेकडून इराणला शस्त्रे आणि ड्रोन पुरवण्यास मदत करणाऱ्या १० कंपन्यांवर निर्बंध

अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील कंपन्यांसह १० कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

Physical Relation : जगातील 'या' देशात चालते सेक्सच्या बदल्यात नोकरीची प्रथा; आता होणार कायदेशीर कारवाई!

आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये आजही काही अशा प्रथा अस्तित्वात आहेत, ज्या ऐकून सभ्य समाजाला धक्का बसेल. घाना या

Donald Trump Tariffs : ट्रम्प प्रशासनाला मोठा झटका! अमेरिकन न्यायालयाने नवे आयात शुल्क केले रद्द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या फेडरल