SRH Beat KKR IPL 2025: हैदराबादने बदला घेतला! गेल्या हंगामातील विजेत्या कोलकात्याला लोळवले

मुंबई: सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना  (SRH vs KKR) हा खऱ्या अर्थाने रंजक ठरला. आयपीएलच्या गेल्या हंगामातील विजेते आणि उपविजेते असे हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले होते. पण हंगामातील शेवटच्या सामन्यात सनरायझर्सने आपली पूर्ण ताकद दाखवत, गेल्या हंगामातील विजेत्या कोलकात्याचा ११० धावांनी धुव्वा उडवला.

सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांसमोर कोलकाता नाईट रायडर्सला धड २० ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादच्या फलंदाजानंतर गोलंदाजांनी चोख भूमिका पार पाडली आणि दणदणीत विजय मिळवला.

पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात हैदराबाद संघाने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मोठ्या फरकाने मात करत आयपीएलच्या 18 व्या हंगामातील शेवट विजयाने केला आहे. हैदराबादने केकेआरचा ११० धावांनी दारुण पराभव केला.  हैदराबादने केकेआरसमोर विजयासाठी २७९ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हैदराबादच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांना १८.४ ओव्हरमध्ये १६८ धावांवरच गुंडाळलं.  हैदराबादने यासह आयपीएलच्या इतिहासातील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय साकारला.

हैदराबादच्या फलंदाजांची तूफान फटकेबाजी


सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने चांगली सुरुवात केली. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. अभिषेक १६ चेंडूत ३२ धावा काढून बाद झाला. पण, त्याच्यानंतर हेनरिक क्लासेनने केकेआर संघाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. हेडने ४० चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ७६ धावा केल्या.   तर क्लासेनने १०९ धावांच्या खेळीत एकूण ७  चौकार आणि ९ षटकार मारले. असे करत क्लासेन आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज बनला. हा उजव्या हाताचा फलंदाज शेवटपर्यंत नाबाद राहिला. याव्यतिरिक्त इशान किशनने २९ धावांचे योगदान दिले.

कोलकाताचे फलंदाज ठरले फेल 


279 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात चांगली झाली नाही. सुनील नारायण, मनीष पांडे आणि हर्षित राणा या तिघांचा अपवाद वगळता इतर कुणालाही ३० पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. सुनील नारायण याने ३१, हर्षित राणा याने ३४ तर मनीष पांडे याने सर्वाधिक आणि ३७ धावा केल्या. दोघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर दोघे आले तसेच परत गेले अर्थात भोपळाही फोडू शकले नाहीत. सनरायजर्स हैदराबादच्या जयदेव उनाडकट, एशान मलिंगा आणि हर्ष दुबे या त्रिकुटाने केकेआरचं पॅकअप केलं. या तिघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

आणखी एका मेट्रो स्थानकाचे नामकरण : ‘अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी’

मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली मालाड दरम्यानच्या वळणई - मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व

टाटा मोटर्सच्या युजर्ससाठी मोठी बातमी: EV Ecosystem सक्षम करण्यासाठी टाटा मोटर्सचा मोठा निर्णय

आता इलेक्ट्रिक एससीव्हीसाठी (SCVs) २५००० पब्लिक चार्जर्स उपलब्‍ध १२ महिन्‍यांमध्‍ये २५,००० आणखी चार्ज पॉइण्‍ट्स

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मोदींच्या वाढदिवशी ५० हजार ज्येष्ठ नागरिकांना मिळणार गिफ्ट

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा नवी दिल्ली : पंत