'स्टोलन'चा प्राइम व्हिडीओवर जागतिक प्रीमियर

मुंबई : नवा हिंदी ओरिजिनल इन्व्हेस्टिगेटिव्ह क्राईम थ्रिलर चित्रपट'स्टोलन' याचा एक्सक्लुझिव्ह जागतिक प्रीमियर ४ जून २०२५ रोजी प्राइम व्हिडीओवर होणार आहे. करण तेजपाल दिग्दर्शित पहिलीच फीचर फिल्म असून ती जंगल बुक स्टुडिओसाठी गौरव ढींगरा यांनी निर्मित केली आहे. 'स्टोलन' ची कहाणी करण तेजपाल यांनी स्वप्निल सालकार - अगडबम आणि गौरव ढींगरा यांच्यासोबत लिहिली आहे.

फिल्मच्या केंद्रस्थानी आहेत दोन आधुनिक विचारांचे भाऊ, जे ग्रामीण भारतातील एका रेल्वे स्थानकावर एका गरीब महिलेच्या लहान मुलाचं अपहरण होताना पाहतात. नैतिक जबाबदारीने प्रेरित होऊन, एक भाऊ दुसऱ्याला त्या आईची मदत करण्यासाठी आणि त्या मुलाला शोधण्याच्या धोकादायक मोहिमेत सामील होण्यास तयार करतो.

या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, हरीश खन्ना, मिया मेल्जर, साहिदुर रहमान आणि शुभम यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट भारतासह २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये ४ जून रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेली मान्यता


'स्टोलन'ने आपली दमदार सुरुवात व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये केली, जिथे त्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं. त्यानंतर चित्रपटाने बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफी आणि अभिनेत्रीचे पुरस्कार पटकावले. जपानमधील स्किप सिटी इंटरनॅशनल डी-सिनेमा फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शकाचे पुरस्कार मिळाले. झ्युरिच फिल्म फेस्टिव्हल कडून विशेष उल्लेख मिळाला. भारतात याचे प्रीमियर जिओ मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले आणि त्यानंतर २८ व्या केरळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील चित्रपट सादर करण्यात आला.
Comments
Add Comment

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं