पावसाचा फटका रेल्वे वाहतूक कोलमडली, रस्ते वाहतूक मंदावली, अंधेरी सब वे बंद

मुंबई : मे महिन्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला फटका बसला. एरवी घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात संथ गतीने झाली. सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी सब वे पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रुळ गायब झाले. रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा ते वीस मिनिटे उशिराने धावत आहेत. ऑफिसला जात असलेले अनेकजण पावसामुळे ठिकठिकाणी अडकले आहेत. मिळेल त्या वाहनाने पुढे प्रवास करुन जात आहेत.

मध्य रेल्वेच्या मशिद बंदर तसेच चुनाभट्टी आणि सायन या स्थानकांवर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक पुरती कोलमडली आहे.

केईएम रुग्णालयाच्या आवारातही पाणी साचले आहे. गांधी मार्केट, सायन रोड क्रमांक २४, वडाळा उड्डाणपुलाखालील भाग, हिंदमाता येथे पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे.

भरती आली असल्यामुळे उंचच उंच लाटा येत आहेत. नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती