पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर

दाहोदमध्ये 24,000 कोटी, भुजमध्ये 53,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण

गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशोगाथेचा गौरव सोहळा


नवी दिल्ली : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 26 व 27 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर असतील. 26 मे रोजी ते दाहोद येथे जातील. सकाळी सुमारे 11:15 वाजता ते दाहोद येथील लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील आणि एका इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते सुमारे 24,000 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण करतील. पंतप्रधान यावेळी एका सार्वजनिक सभेला देखील संबोधित करतील.

पुढे, पंतप्रधान भुज येथे जातील. सायंकाळी 4 वाजता ते सुमारे 53,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण करतील आणि एका सार्वजनिक कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.

27 मे रोजी पंतप्रधान गांधीनगर येथे ‘गुजरात अर्बन ग्रोथ स्टोरी’च्या 20 वर्षांचा गौरव सोहळ्यात सहभागी होतील आणि ‘ नागरी विकास वर्ष 2025’ चा शुभारंभ करतील. हे कार्यक्रम सकाळी 11 वाजता होतील. या कार्यक्रमातही ते जनतेला संबोधित करतील.

देशातील प्रवास व वाहतूक सुविधा सुधारण्याच्या आपल्या संकल्पनेनुसार, पंतप्रधान दाहोद येथील भारतीय रेल्वेच्या लोकोमोटीव्ह उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करतील. या प्रकल्पात देशांतर्गत वापरासाठी व निर्यातीसाठी 9000 अश्वशक्ती क्षमतेच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचे उत्पादन केले जाईल. पंतप्रधान या प्रकल्पातून तयार झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला देखील हिरवा झेंडा दाखवतील. हे लोकोमोटिव्ह भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक क्षमतेत वाढ करतील. यामध्ये ऊर्जा-बचत करणारी ‘रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम’ असेल, जी पर्यावरणपूरक आहे.

यानंतर पंतप्रधान दाहोदमधील सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे पायाभरणी व लोकार्पण करतील. यामध्ये रेल्वे प्रकल्प, गुजरात सरकारच्या विविध योजना, वेरावल–अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन व वलसाड–दाहोद दरम्यान जलदगती रेल्वेचा शुभारंभ समाविष्ट आहे. तसेच कटोसन–कलोल विभागाचे रुंदीकरण रूपांतरण पूर्ण झाल्यानंतर मालगाडीला देखील हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.

भुज येथे पंतप्रधान सुमारे 53,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण करतील. या प्रकल्पांमध्ये खावडा अक्षय उर्जा उद्यानामध्ये निर्माण होणाऱ्या अक्षय ऊर्जेच्या वहनासाठी प्रसारण प्रकल्प, विद्युत प्रसारण जाळे विस्तार, तापी येथील अत्यंत उच्चदाब तापीय विद्युत प्रकल्प केंद्र, कांडला बंदर प्रकल्प, तसेच रस्ते, पाणीपुरवठा व सौरऊर्जा यासारखे अनेक प्रकल्प समाविष्ट आहेत.

गुजरातमध्ये 2005 साली सुरू झालेल्या नागरी विकास वर्ष या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरी विकास वर्ष 2025, राज्य स्वच्छ हवामान कार्यक्रम यांची सुरुवात गांधीनगर येथे केली जाईल. यावेळी पंतप्रधान शहरी विकास, आरोग्य व पाणीपुरवठा यासंबंधी विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करतील. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 22,000 हून अधिक घराचे लोकार्पण देखील केले जाईल. याशिवाय, स्वर्णिम जयंती मुख्यमंत्री शहरी विकास योजना अंतर्गत 3,300 कोटी रुपयांचे अनुदान शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केले जाईल.
Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात