Mumbai Rain: माहीममध्ये धोकादायक इमारतीचा भाग कोसळला; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबई नैऋत्य मान्सूनने काल रात्रीपासून जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. काही दिवस आधीच येऊन धडकलेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांचे जनजीवन पुरते विस्कळीत झालं आहे. सकाळी देखील पावसाची धोधो कायम राहिल्याने मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, दरम्यान माहीम (Mahim) मध्ये मुसळधार पावसामुळे हाजी कसम इमारतीचा काही भाग कोसळला (Building Collapse) असल्याची बातमी समोर आली आहे. तसेच माहीममध्येच दुसऱ्या एका भागात झाड देखील कोसळलं आहे.


मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने हे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. दादर माहीम भागात देखील तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान माहीममध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. ही इमारत पितांबर लेन परिसरातील असून ती धोकादायक असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले होते. सोमवारी या इमारतीच्या छताचा काही भाग आणि इमारतीचा जिना अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि बीएमसीचे अभियंते तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला असून पुढील बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेत आर्थिक काटकसरीला सुरुवात

अधिकाऱ्यांच्या वाहन सेवांमध्येच पहिली कपात मुंबई : मुंबई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इतरही

गोरेगावमध्ये खुलेआम कबुतरांना खाद्य देणे सुरूच

मुंबई : न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबुतर खाने बंद केले जात असतानाच गोरेगाव पश्चिम भागातील जवाहर नगर

मुंबई मेट्रो - ११ च्या प्रकल्पाच्या नवीन मार्गाची प्रक्रिया सुरू

मुंबई : नुकतीच संपूर्ण मेट्रो-३ मार्गिका कार्यान्वित होत असताना, मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटडने (एमएमआरसीएल)

राज्यात ५,८६६ कोटी रुपये बँकांमध्ये बेवारस

मुंबई : देशभरात सुमारे १ लाख ३५ हजार कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी विविध बँकांमध्य शिल्लक आहेत. महाराष्ट्र

मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीनेच

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक २०२५ निवडणुकीकरता प्रभाग आरक्षण कार्य प्रणाली कशी

मुंबईत 'मेगा ब्लॉक'मुळे होणार 'या' मार्गांवरील प्रवाशांचे हाल!

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीचे काम; अनेक गाड्या रद्द, वळवण्यात आल्या किंवा अर्ध्यातच स्थगित मुंबई: