मीरा-भाईंदर बस आगार बनले समस्यांचे आगार

भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस आगारातील अग्निशमन यंत्रे निकामी झाली आहेत, सीसीटीव्ही मॉनिटर स्क्रीन बंद अवस्थेत आहे, चार्जिंग स्टेशन उघड्यावर पडले आहे. त्यामुळे महापालिकेचे बस आगार समस्यांचे आगार बनले असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली आहे. त्यावर सहाय्यक आयुक्त परिवहन यांनी तक्रारीची तातडीने तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताना दिले आहे.



सरकारी पोर्टलवर तसेच पालिका प्रशासनाकडे फोटोसह दिलेल्या तक्रारीत सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांनी नमूद केले आहे की, आगार परिसरात काही ठिकाणी अग्निशमन यंत्रे ठेवलेली आहेत मात्र ही सर्व यंत्रे निकामी झालेली आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठी दुर्घटना घडू शकते. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत मात्र सर्व्हर रूम किंवा लाईव्ह स्क्रिमिंग मॉनिटर स्क्रिन बंद असल्याने या सीसीटीव्हीचा उद्देश सफल होत नाही. आगार परिसरात परिवहन बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे; परंतु या चार्जिंग स्टेशन भोवती सुरक्षा भिंत तसेच सुरक्षा रक्षक नाही. आगारात कर्मचारी विश्रांती गृह आहे मात्र विश्रांती घेण्यासाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध नाही. याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

याच बरोबर परिवहन सेवा सुध्दा अनियमित झाली असल्याची तक्रार अनेक प्रवासी करत आहेत. परिवहन सेवेच्या अनेक डिझेल बस यांत्रिक बिघाडामुळे दररोज रस्तोरस्ती बंद अवस्थेत उभ्या असतात. तसेच काही इ-बससुद्धा बंद पडलेल्या असतात, तर इलेक्ट्रिक बस चार्जिंग नसल्यामुळे ठाण्यावरून कोणताही थांबा न घेता थेट डेपोमध्ये आणल्या जात आहेत. तसेच त्या पूर्ण चार्ज न करताच पुढे चालविण्यात येतात. या सर्व गोंधळामुळे प्रवाशांचे हाल होतात. हे सर्व पाहता परिवहन उपक्रमातील बस डेपो व इमारती बाबत प्राप्त झालेल्या तक्रारीची तातडीने तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी असे पत्र सहाय्यक आयुक्त (परिवहन) यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठविले आहे.
Comments
Add Comment

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे