'मुंबईत थायरॉइडच्या रुग्णांमध्ये वाढ'

  24

मुंबई :भारतामध्ये जवळपास ५० दशलक्ष भारतीय, विशेषतः महिला, थायरॉइड विकारांनी ग्रस्त आहे आणि हे प्रमाण दरवर्षी मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये वाढताना दिसत आहे, असे आरोग्यविषयक शासकीय आकडेवारी व निदान करणाऱ्या प्रयोगशाळांकडून मिळालेल्या आकडेवारीवरून
दिसून येते.


नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-४ ने असे आढळले की, महाराष्ट्रातील १.८ टक्के महिलांना २०१५-२०१६ मध्ये गालगुंड किंवा इतर थायरॉइड विकार होते आणि एनएफएचएस-५ नुसार तीन वर्षांनी हे प्रमाण २.१ टक्के पर्यंत वाढले आहे. भारतात आरोग्य संस्थांच्या आकडेवारीनुसार हे प्रमाण २.२ टक्क्यांवरून २.७ टक्के पर्यंत वाढलेले दिसते. आयोडीनची कमतरता, विशेषतः अंतर्गत भागांमध्ये, थायरॉइड विकारांचे एक मुख्य कारण आहे. आहारातील बदल, जीवनशैलीतील बदल, आणि पर्यावरणीय घटक देखील थायरॉइड विकारांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. थायरॉईड विकारांची वाढती संख्या लक्षात घेता, नियमित तपासणी, योग्य आहार, आणि सततची वैद्यकीय देखरेख आवश्यक आहे.



विशेषतः महिलांनी आणि वयस्कर व्यक्तींनी थायरॉइड तपासणीसाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. लीलावती हॉस्पिटल, वांद्रे येथील ज्येष्ठ एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी म्हणाले की, वाढलेली संख्या ही लोकांमधील या आजाराविषयची वाढती जागरूकता आणि थायरॉइड निदान चाचण्यांमुळे दिसून येते. ऑटोइम्युनिटी ही संपूर्ण जगभर वाढत आहे आणि भारतही याला अपवाद नाही, परंतु थायरॉइड विकारांच्या संख्येमध्ये वाढ होणे हे जागरूकता आणि निदानाचे प्रतिबिंब आहे, असे ते म्हणाले. आजच्या महिला एकाच वेळी अनेक कामं करतात आणि तणावांमुळे थायरॉइड विकारांची शक्यता वाढत असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता