Gold Rate: आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

जळगाव: गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी वाढ झाल्याने खरेदीदारांना झळ बसत आहे. अशातच आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने दरात घसरण झाली. यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आज सोमवारी (२६ मे) सोन्याचे भाव प्रति तोळा ४४० रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याच्या किमतीसोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे.


सोने दरात झालेल्या घसरणीनंतर १ तोळा सोन्याचे दर ९७,६४० रुपये आहे. काल हेच दर ९८,०८० रुपये होते. या किंमती घसरल्या आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,११२ रुपये आहेत. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे. आज २२ कॅरेट सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ८९,५०० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,६०० रुपये आहेत.


या किंमतीत ३२० रुपयांनी घट झाली आहे. १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात ३३० रुपयांनी घट झाली आहे. आज १ तोळा सोने ७३,२३० रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे. सोन्यासोबतच चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. चांदीचा भाव ९७,८७८ रुपये प्रति किलो आहे.

Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात