मुंबई : मिठी नदीचा गाळ काढण्याच्या प्रकल्पातील कथित अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराप्रकरणात अभिनेता डिनो मोर्याची सोमवारी मुंबई पोलिसांनी चौकशी केली. अभिनेता डिनो मोर्या उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांचा निकटवर्तीय मानला जातो.
याप्रकरणी तीन पालिका अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन मध्यस्थी व दोन कंपन्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गैरव्यवहारामुळे पालिकेला ६५ कोटी ५४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अभिनेता डिनो मोर्याला समन्स बजावले होते. त्याअंतर्गत त्याला सोमवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यानुसार तो सोमवारी मुंबई पोलीस आयुक्तालयात चौकशीला उपस्थित राहिला. त्याची चौकशी सुरू असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले