बुलेट ट्रेनच्या प्रवासासाठी पहिले रेल्वे स्टेशन बांधून तयार

सूरत-बिलिमोरा स्थानकांदरम्यान ऑगस्ट २०२६ रोजी प्रवासाचा अंदाज


नवी दिल्ली :भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या बुलेट ट्रेनबाबतची काही महत्त्वपूर्ण माहिती दिली केली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३०० किमी लांबीचा वायाडक्ट तयार झाला आहे. त्याशिवाय गुजरातमधील सूरतजवळ ४० मीटर लांबीच्या बॉक्स गर्डरचे काम सुरू झाले आहे.



बुलेट ट्रेनच्या ३०० किमी मार्गावरील २५७ किमी मार्गाची निर्मिती ही फुल स्पॅन लाँचिंग तंत्रज्ञानाच्या आधारावर करण्यात आले आहे. त्यामुळे काम अधिक वेगाने झाले. या दरम्यान, अनेक लांब नदी पूल, स्टील आणि पीएससी ब्रिज आणि स्टेशन बिल्डिंगही बांधण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या प्रकल्पामधील ३८३ किलोमीटर पीयर्स, ४०१ किमी फाऊंडेशन आणि ३२६ किमी गर्डर कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. या बुलेट ट्रेनच्या मार्गावर एकूण ३ स्टेशन तयार होत आहेत. त्यातील सूरतमध्ये भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्टेशन जवळपास बांधून तयार झाले आहे. येथील उर्वरित काम वेगाने सुरू आहे. गुजरातमध्ये सुमारे १५७ किमी मार्ग जवळपास बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून बुलेट ट्रेनची चाचणी सुरू होऊ शकते.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या