Mumbai Police: मुंबई पोलिस शिपाईचा होणार आता जवानांप्रमाणे सन्मान!

  127

मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेश जारी


मुंबई: मुंबई पोलीस दलातील प्रत्येक शिपाईचा यापुढे सैन्यातील जवानाप्रमाणे विशेष सन्मान करण्याचा आदेश, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती (Deven Bharti) यांनी सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना दिला आहे.  सैन्यामध्ये ज्याप्रकारे पदोन्नती मिळाल्यानंतर प्रत्येक जवानांचा सन्मान केला जातो. हीच प्रथा आता मुंबई पोलीस (Mumbai Police) दलात सुरू केली जाणार आहे.


मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी, मुंबई पोलीस दलातील पदोन्नती मिळालेले अधिकारी आणि अंमलदारांचा बँड पथकाच्या संचलनाद्वारे सन्मान करा, असा आदेश सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्राद्वारे दिला आहे. पोलिसांच्या पदोन्नतीचे आदेश जारी होताच त्यानंतर येणाऱ्या 1 तारखेला त्यांचा सन्मान केला जावा, असे निर्देश भारती यांनी दिले.


मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त हे पदोन्नतीप्राप्त अंमलदारांचा तर पोलिस सहआयुक्त हे उपनिरीक्षक ते सहायक आयुक्तपर्यंत दर्जाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करतील. यात अंमलदार असो वा अधिकारी पदोन्नती मिळाल्यावर त्यांचे मनोबल वाढावे, केवळ प्रशासकीय बाब नाही तर काम करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.



पदोन्नती हा निव्वळ प्रशासकीय सोपस्कार न राहता प्रेरणास्रोत व्हावा हा उद्देश


पदोन्नती ही केवळ पदवाढ नसून त्यामागे संबंधित अधिकारी, अंमलदारांची अनेक वर्षांची निष्ठा, मेहनत दडलेली असते. पदोन्नती म्हणजे कर्तव्यादरम्यान पार पाडलेली जबाबदारी, कर्तृत्व व समर्पणाला मिळालेली मान्यता असते, असे ही त्यात नमूद केले आहे. त्यामुळे पदोन्नती हा निव्वळ प्रशासकीय सोपस्कार न राहता प्रेरणास्रोत व्हावा, हा उद्देश असल्याचेही देवेन भारती यांनी पत्रात म्हटले आहे.



निवृत्त पोलीस अधिकारी शारदा प्रसाद यादव यांचे निधन


दरम्यान काल शनिवारी रात्री निवृत्त पोलीस अधिकारी शारदा प्रसाद यादव यांचे 67 व्या वर्षी मुंबईत निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर माहीम येथील हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू होते. गोरेगाव पूर्व येथील आरे परिसरातील शिवधाम स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मुलगा खासगी विमान कंपनीत वैमानिक पदावर कार्यरत असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.



नागपूर पोलीस आयुक्त पदाची कारकिर्द राहिली चर्चेत


यादव भारतीय पोलीस सेवेच्या 1986च्या तुकडीचे अधिकारी होते. यादव यांची नागपूर पोलीस आयुक्त पदाची कारकिर्द चर्चेत राहिली. यावेळी त्यांनी पोलीस व नागरिकांमधील संबंध मैत्रीपूर्ण करण्याकडे भर दिला होता. त्याचा परिणाम गुन्हे रोखण्यासाठीही झाला होता. गुंड आणि गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा(मोक्का) अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारी मोडीत काढली. त्या काळात त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना व्हाट्सअ‍ॅप  ग्रुप, फेसबुक आणि ट्विटरवर अकाउंट सुरू करण्यास प्रोत्साहित केले. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमुळे जनतेशी चांगले संबंध राखण्यास मदत झाली. राज्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) पदावरही कार्यरत होते. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त महासंचालक पदीही ते कार्यरत होते.















Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही