मनीची शाळा

स्नेहधारा : पूनम राणे


सकाळची ७ ची वेळ होती. सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. पक्षांचा किलबिलाट चालू होता. दोन-तीन माकडे झाडावरून इकडे तिकडे उड्या मारत होती. खारुताईची जोडी झाडावरून वर-खाली करत धावण्याची स्पर्धा खेळत होत्या. कोकिळेचा पंचम स्वर सुरू होता.


इतक्यात प्रार्थनेची बेल वाजली. सारी मुले धावतच मैदानात जमा झाली. वर्गांच्या रांगा करण्यात आल्या. वर्गशिक्षक आपापल्या वर्गासमोर उभे राहून रांगा नीट करू लागले. सावधान-विश्रामच्या सूचना देण्यात आल्या. प्रार्थना सुरू झाली. ध्यानधारणेची वेळ होती. इतक्यात एक मनीमाऊ एका मुलीच्या मांडीवर बसून ध्यान करत असताना पाहिली. पांढऱ्या शुभ्र रंगाची, कनवाळू डोळ्यांची, छोटीशी मनी. मनी रोज प्रत्येक मुलाच्या मांडीवर बसून ध्यान करणे हे तिचे नित्याचेच चालू होते.

मनी आता विद्यार्थ्यांची मित्र बनली होती. मनीला विद्यार्थ्यांशिवाय आणि विद्यार्थ्यांना मनीशिवाय करमत नसे. वर्गात एकूण पन्नास विद्यार्थी होते. नित्यनेमाने रोज प्रत्येक विद्यार्थी आळीपाळीने मनीला घरून बाटलीतून दूध घेऊन येत होते. विद्यार्थ्यांना तिचा लळाच लागला होता. पहिल्या तासापासून शेवटच्या तासापर्यंत मनी वर्गातच बसलेली असे. कान टवकारून प्रत्येक शिक्षकाचा तासालाही बसत असे. आवाज न करता. अशाप्रकारे विद्यार्थ्यांमध्ये प्राणीप्रेम, पशुप्रेम दिसून येत होते. ममत्वाचा एक विशेष गुण संक्रमित होत होता. जीवन मूल्याची रुजवण होत होती.


उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना सुट्टी असते. मात्र अ‍ॅडमिशनकरिता कार्यालय चालूच असते. या काळात मनी मात्र कुठेच दिसली नाही. “ न जाणो तिला सुद्धा विद्यार्थ्यांनी एक एक दिवस आपल्या घरी बोलावलं असेल. आपली मित्र-मैत्रीण म्हणून!” जूनमध्ये शाळा सुरू होईल आणि मनी नक्कीच पुन्हा तिच्या शाळेत परत येईल. हे मात्र निश्चित.

Comments
Add Comment

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरे पद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती

चिरतरुण...

संवाद ; गुरुनाथ तेंडुलकर अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जग‌द्विख्यात गायिका आशा भोसले

‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’

नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरे पूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची

धीर धरी...

आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानू टीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल? संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच

आत्मप्रतिष्ठेचं भान

स्मृतिपटल; अनिल तोरणे कोणत्याही गोष्टीचा कैफ प्रमाणाबाहेर चढणे केव्हाही अनिष्टच ठरते. गतकाळातील एका

सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक

ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णी माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या