देवळेकरांकडून भारतीय सैनिकांचा अभिमान; तिरंगा रॅलीने वेधले लक्ष

  22

देवळा : ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर व भारतीय सेनेच्या सन्मानार्थ देवळा शहरातून शनिवार (दि .२४) रोजी सकाळी १० वाजता तिरंगा यात्रा काढण्यात आली. येथील सुट्टीवर आलेले तसेच माजी सैनिक, राष्ट्रप्रेमी नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकारी व विद्यार्थीवर्गाने यावेळी उपस्थित होते. माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीत शाळा, महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी तसेच महिला देखील सहभागी झाल्या होत्या. प्रत्येकाच्या हातात तिरंगा ध्वज व भारत माता की जय च्या जयघोषात निघालेल्या रॅलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. शिवस्मारक, बसस्थानक, पाच कंदील, सुभाषरोड व बाजारपेठेतून ही रॅली पुन्हा शिवस्मारकाजवळ आली. यावेळी सिंदूर ऑपरेशनबद्दल तसेच भारतीय सैनिकांनी बजावलेल्या कामगिरीबाबत माहिती सांगत एकजुटीचे आवाहन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष संजय आहेर, नगरसेवक जितेंद्र आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, दिनकर निकम, भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर आहेर,अशोक आहेर, प्रमोद पाटील, माजी सैनिक मांगु लोखंडे, देवानंद वाघ, दिलीप पाटील, प्रतीक आहेर, संदीप देवरे, स्वप्नील पाटील, एन.डी. पाटील, डॉ.रमणलाल सुराणा, प्रदीप सुराणा, योगेश आहिरे, पंकज गांगुर्डे, जगन्नाथ माळी, प्रमोद शेवाळकर, मनोज गुजरे, शंकर निकम, शब्बीर शेख, तुषार गुंजाळ, वैद्यनाथ देवरे, समाधान महाजन, अरुणा खैरणार,नीलिमा आहेर, बाळासाहेब आहेर, मनोज आहेर, समाधान सोनजे,नईम शेख यांच्यासह देवळा तालुक्यातील अकेडमीचे तसेच महाविद्यालयाचे व क्लासेसचे विद्यार्थी,विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक