Patanjali E-Schooter: पतंजली लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर! काय आहे सत्य? जाणून घ्या

योगगुरू बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. 


नवी दिल्ली: सध्या भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल करत आहेत. या स्पर्धेत रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीने देखील उडी घेतली असल्याचं म्हंटलं जात आहे. त्यामुळे आयुर्वेदिक क्षेत्रातील रामदेव बाबा आता गाड्या विकणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे. तर या मागे नेमकं खर काय कारण आहे? ते जाणून घ्या.

रामदेव बाबा यांची पतंजली कंपनी लवकरच ई-स्कूटर  घेऊन येत असल्याचे म्हंटले जात आहे. पतंजलीच्या ई-स्कूटर बाबत अनेक मोठमोठे दावे देखील करण्यात आले आहेत. असे म्हंटले जात आहे की, ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 440 किलोमीटरची रेंज देईल,  ज्याची किंमत 15,000 पासून सुरू होईल असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यांसह एका इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

रामदेव बाबा आता खरंच ई-स्कूटर विकणार?


या महिन्याच्या सुरुवातीला काही वेबसाईट्स आणि सोशल युजर्सनी पतंजलीच्या ई-स्कूटरबाबत काही माहिती प्रसिद्ध केली होती. त्यात एका इलेक्ट्रिक स्कूटरचा फोटोही इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र सत्य काही वेगळेच आहे.  कारण पतंजलीने ही इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याबाबत कधीच काही सांगितलेले नाही. याशिवाय पतंजलीइ लेक्ट्रिक स्कूटर्सचे स्पेसिफिकेशनही एखाद्या विनोदापेक्षा कमी नाहीत.

पतंजली काय विकते?


पतंजली कंपनी अनेक आयुर्वेद उत्पादने तसेच औषधे, साबण आणि ब्युटी प्रॉडक्ट्स बाजारात विकते. ही कंपनी आयुर्वेदिक उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार करते. पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनांवरही भारतातील लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे पतंजली इलेक्ट्रिक उत्पादनात सध्या तरी उतरेल असे वाटत नाही, त्यामुळे पतंजली अशाप्रकारे कोणतीही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे, ही माहितीच मुळात निराधार आहे.
Comments
Add Comment

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे नवे सरन्यायाधीश; २४ नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे ५३वे सरन्यायाधीश म्हणून

भारताला सागरी रोजगाराचे जागतिक केंद्र बनवणार!

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला इंडिया मेरीटाईम वीकमध्ये विश्वास नवी दिल्ली : केंद्रीय

बिहारला ‘जंगलराज’ पासून वाचवा!

गृहमंत्री शहा आणि नड्डा यांचा बिहारच्या मतदारांना इशारा पाटणा: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे

२६/११ आरोपी 'राणा'चे पाकिस्तान कनेक्शन तपासा!

राष्ट्रीय तपास संस्थेकडूनअमेरिकेकडे विशिष्ट माहितीची मागणी; मोठी चौकशी सुरू नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास

बिहार निवडणूक 2025 : फिलोदी सट्टा बाजारानं निवडणुकीच्या निकालाविषयी केलं भाकीत

पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीचं तापमान चढलं असलं तरी सगळ्यांची नजर आता राजस्थानच्या प्रसिद्ध फिलोदी सट्टा