PBKS vs DC, IPL 2025: दिल्लीने शेवट केला गोड, पंजाबला ६ विकेट राखत हरवले

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ६६व्या सामन्यात आज पंजाब किंग्स संघाला दिल्ली कॅपिटल्सने ६ विकेट राखत हरवले. याविजयासह दिल्लीने आयपीएलचा शेवट गोड केला आहे. दिल्लीसमोर पंजाबने विजयासाठी २०७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीने हे आव्हान ६ विकेट राखत पूर्ण केले.


या सामन्यात टॉस जिंकत दिल्लीने पंजाबला फलंदाजीचे निमंत्रण दिले होते. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद २०६ धावा केल्या होत्या. दिल्लीला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर त्यांना २०७ धावा हव्या होत्या. दिल्लीने या सामन्यात २०८ धावा केल्या.


दिल्लीकडून समीर रिझवीने सर्वाधिक ५८ धावा ठोकल्या. तर सलामीवीर केएल राहुलने ३५ धावा केल्या. फाफ डू प्लेसिसने २३ धावा केल्या. करूण नायरने ४४ धावांची खेळी केली.


तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या पंजाबची सुरूवात चांगली राहिली नाही. प्रियांश आर्य आणि प्रभासिमरन यांनी डावाची सुरूवात केली. मात्र दुसऱ्याच षटकांत प्रियांशने विकेट गमावली. त्याने केवळ ६ धावा केल्या. यानंतर जोस इंग्लीश आणि प्रभसिमरनची चांगली जोडी जमली. दोघांनी तडाखेबाज खेळी केली. ५ षटकांत त्यांनी पंजाबचा स्कोर ५० पार नेला. यानंतर ८व्या षटकांत प्रभासिमरनने आपली विकेट गमावली. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहाल वढेरा यांच्यात चांगली भागीदारी झाली. ११व्या षटकांत पंजाब १०० पार पोहोचला. मात्र १३व्या षटकांत पंजाबला चौथा झटका बसला. नेहाल १६ धावा करून बाद झाला. यानंतर १६व्या षटकांत शशांक बाद झाला. मात्र दुसऱ्या बाजूला श्रेयस अय्यर टिकून होता. त्याने १७व्या षटकांत अर्धशतक ठोकले. यानंतर तो बाद झाला.


Comments
Add Comment

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव