नाशिक बाजार समितीत हॉटेल व टपऱ्यांचे बेकायदेशीर काम

देविदास पिंगळे यांचा आरोप; चुंभळे यांचा आत्मपरीक्षणाचा सल्ला


पंचवटी:दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात हॉटेल व टपऱ्यांचे काम सुरू झाले आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची की टपऱ्यांची असा सवाल माजी सभापती देविदास पिंगळे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक यांना पत्र देत योग्य ती कारवाई करीत सदरचे काम थांबवून योग्य ते आदेश देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सभापती कल्पना चुंभळे यांनी पिंगळे यांचे आरोप फेटाळत त्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. नाशिक कृषी उपन्न बाजार समितीत मुख्य बाजार आवारात नाशिक तालुक्यातील म्हसरूळ मखमलाबाद ,दरी, मातोरी, मुंगसरा, गिरणारे,गोवर्धन,दूगाव, धोंडेगाव आणि लासलगाव, निफाड, कळवण सिन्नर, दिंडोरी, पेठ, त्रंबकेश्वर फळभाज्या व पालेभाज्याची आवक होत असते. दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात शेतकऱ्याची वर्दळ सुरू असते.


शेतकऱ्याच्या सुविधा होणे कामी येणाऱ्या शेतमालाची आवक बघता आवारात वाढलेले अनधिकृत टपऱ्यांचे अतिक्रमण आपण काढून टाकले होते, असे पिंगळे यांनी म्हटले आहे. बाजार समितीच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शेतकऱ्याच्या पालेभाज्यांचा लिलाव होत असतो. मात्र, काही दिवसांपूर्वी सत्तांतर होऊन काही काळ लोटताच पुन्हा बेकायदेशीर टपऱ्या व हॉटेलचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. यात समितीच्या प्रवेशद्वारावरच उजव्या बाजूला टपरी व गाडा लावण्यात आला आहे. तसेच कार्यालयाच्या बाजूला हॉटेलचे बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याबाबतचे पत्र पिंगळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांना दिले आहे.


लिलावासाठी, पार्किंगसाठी अडचण होत असल्याने माझ्या काळात हे अतिक्रमित टपऱ्या हॉटेल्स काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुविधेत भर पडली होती. मात्र, सद्यस्थितीत बेकायदेशीर हॉटेल्स व टपऱ्यांसाठी जागा देण्याचे काम सुरू केले आहे. हे शेतकऱ्याच्या दृष्टीने योग्य नसून यामुळे विद्रुपीकरणासह अतिक्रमणात वाढ होईल.- देविदास पिंगळे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक.


माजी सभापती पिंगळे यांनी त्याच्या कार्यकाळात कुठलीही परवानगी न घेता गाळे वाटप केले. प्रथम त्यांनी स्वतःच आत्मपरिक्षण करावे. दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी त्यांची अवस्था आहे. त्यांनी भ्रष्टाचार करत मालमत्ता जमा केली आहे, भविष्यात त्यांची चौकशीहोणार आहे.कल्पना चुंभळे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक

Comments
Add Comment

जन्मदात्या आईनेच विकले सहा चिमुरडे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथे हादरवणारी घटना नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव

मनमाड-कसारा, कसारा-मुंबई मार्गावर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनला केंद्राकडून मंजुरी

तांत्रिक अडथळे दूर होणार; खा. राजाभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश नाशिक : नाशिक तसेच उत्तर

सप्तशृंगगड घाटात इनोव्हा कार ७०० फूट दरीत कोसळली; सहाजण ठार

सप्तशृंगगड : नांदुरी ते श्री सप्तशृंगगड घाटरस्त्यावर रविवारी ( दि.७) संध्याकाळी भाविकांची इनोव्हा कार सुमारे ७००

सप्तशृंगी गडाच्या मार्गावर अपघात, दरीत कोसळून सहा जणांचा मृत्यू

नाशिक : सप्तशृंगी गडावरील गणपती घाटात इनोव्हा कार खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. सुमारे १००० ते १२०० फूट खोल

नाशिक जिल्ह्यातील ११ नगर परिषदांसाठी आज होणार मतदान

नगरसेवक पदासाठी १०२८, तर नगराध्यक्षपदासाठी ६१ उमेदवार आखाड्यात नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यातील ११

कुंभमेळा आरक्षित क्षेत्राचे संपादन न करता कारवाई रद्द करावी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिका विकास आराखड्यानुसार साधूग्राम व संलग्न सुविधांसाठी एकूण सुमारे ३७७ एकर