DC vs PBKS, IPL 2025: दिल्ली शेवट गोड करेल का?

मुंबई(सुशील परब):  पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना जयपूर येथे खेळविण्यात येणार आहे. त्यांचा मागील सामना भारत-पाकिस्तान तणावामुळे रद्द करण्यात आला होता. पंजाब किंग्जने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र त्यांना फक्त पहिल्या स्थानासाठी विजय मिळवायचा असून पंजाब किंग्जचे पारडे जड आहे.


तसेच प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, नेहल वधेरा, श्रेयश अय्यर, शशांक सिंग असे फलंदाज त्यांच्याकडे असून या स्पर्धेत त्यांनी फलंदाजीत सातत्य राखले आहे. प्रभसिमरन सिंगने १२ सामन्यांत ४५८ धावा केल्या आहेत. तसेच तो चांगली फलंदाजी करून ऑरेंज कॅपसाठी प्रयत्न करेल.


पंजाब किंग्जची गोलंदाजी ही उत्तम असून युजवेंद्र चहल, हरप्रित ब्रार, अर्शदीप सिंग, मार्कस स्टोइनिस, कुलदीप सेन असे चांगले गोलंदाज आहेत. त्याचप्रमाणे दिल्ली कॅपिटल प्लेऑफ मधून बाहेर आहेत ते पंजाब किंग्जला रोखण्याचा प्रयत्न करतील.


के. एल. राहुल, करुन नायर, डुप्लेसिस, अभिषेक पोरेल, स्टब्स, अक्षर पटेल असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत, तर टी नटराजन, मुकेश कुमार, मुस्ताफिजुर रहमान, कुलदीप यादव असे गोलंदाज आहेत. चला तर बघुया पंजाब किंग्जला दिल्ली कॅपिटल्स हरवते का?

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात