
नवी दिल्ली : कोरोना पुन्हा एकदा भारतात शहरी भागांमध्ये डोके वर काढत आहे. दिल्ली, मुंबई, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि केरळसह अनेक राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे केंद्र सरकारने आणि स्थानिक प्रशासनांनी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
देशभरातील वाढती कोरोना आकडेवारी:
दिल्ली: २३ नवीन रुग्ण; तीन वर्षांतील ही पहिली मोठी नोंद. दिल्ली सरकारने बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर, टेस्ट किट्स आणि लस स्टॉक सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.
मुंबई: मे महिन्यात आतापर्यंत ९५ रुग्ण; यातील फक्त १६ रुग्ण रुग्णालयात दाखल. लक्षणे असणाऱ्यांना टेस्ट करण्याचे आवाहन.
ठाणे: तीन दिवसांत १० रुग्ण सापडले.
केरळ: मे महिन्यात २७२ रुग्णांची नोंद – देशातील सर्वाधिक. मास्क बंधनकारक; रुग्णालये अलर्ट मोडवर.
कर्नाटक: ३५ नवीन रुग्ण; एका ९ महिन्यांच्या बाळालाही लागण.
नोएडा-गाझियाबाद: नव्याने रुग्ण आढळले.
ही वाढ JN.1 ओमिक्रॉन सब-व्हेरियंटमुळे होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हा प्रकार सध्या जास्त गंभीर नसला, तरी लक्षणे सौम्य असून ताप, गळा खवखवणे, नाक वाहणे, थकवा, डोकेदुखी अशी सामान्य लक्षणे दिसत आहेत.

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू ...
सतर्क राहा, पण घाबरू नका, असा सल्ला आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येत आहे. प्रशासनांनी औषधांचा पुरेसा साठा ठेवला असून, इन्फ्लुएंझा आणि सिव्हियर रेस्पिरेटरी इन्फेक्शनची माहिती दररोज अपलोड करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सूचना: लक्षणं आढळल्यास त्वरित टेस्ट करून घ्या, मास्क वापरा आणि गर्दी टाळा.