एक्सलो पॉइंटजवळ एटीएम फोडून १९ लाखांची चोरी

  24

सिडको : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्सलो पॉईंटजवळ असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने मशीन फोडून तब्बल १८ लाख ७६ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि. २२ मे) उघडकीस आली.


या प्रकरणी मयूर संजय महाजन (वय ३०, वृंदावन पार्क, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम विभागाचे मॅनेजर असून त्यांना गुरुवारी सकाळी त्यांच्या सफाई कर्मचाऱ्याने माहिती दिली की एक्सलो पॉईंटजवळील बँकेच्या एटीएम मशीनचे दरवाजे तुटलेले दिसत आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले.


पोलिसांसमवेत महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, तीन एटीएम मशीनपैकी एका मशीनचे दरवाजे गॅस कटरच्या सहाय्याने उघडण्यात आल्याचे आढळून आले. त्यामधील रोकड चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. सदर मशीनमध्ये १९ मे रोजी एकूण १० लाख रुपये भरले गेले होते. यापूर्वी ग्राहकांनी १.१५ लाख रुपये काढले होते. तर मशीनमध्ये एकूण १८.७६ लाख रुपये शिल्लक होते. ही संपूर्ण रक्कम चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे.


चोरीस गेलेल्या रकमेचे स्वरूप ५०० रुपयांच्या ३७५२ नोटांमध्ये असून, चोरी कधी झाली याबाबतचे अंदाजे वेळ रात्री १२ ते सकाळी १० दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहे. अज्ञात चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस उपनिरीक्षक शेवाळे हे या प्रकरणाचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुरावे गोळा करून तपासाची दिशा ठरवली जात आहे.

Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक