अरे यार, ही बिपाशा आहे का? 'फिटनेस दिवा'चा लूक पाहून चाहते हैराण, व्हिडिओ झाला व्हायरल!

मुंबई : बॉलीवूडची 'ब्लॅक ब्युटी' आणि एकेकाळची फिटनेस आयकॉन बिपाशा बासू (Bipasha Basu) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिच्या अभिनयामुळे नाही, तर तिच्या बदललेल्या लूकमुळे!


सध्या सोशल मीडियावर बिपाशाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जिममधून बाहेर पडताना टिपलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. ट्रॅक पँट, टॉप आणि गळ्यात जिम बॅग घेतलेली बिपाशा स्पष्टपणे स्थूल दिसतेय. तिच्या चेहऱ्यावरही वजनवाढीचे परिणाम स्पष्ट दिसत आहेत.





ती पापाराझींना पाहताच चिडते आणि "अरे यार" म्हणत कारमध्ये बसते. नंतर ती चेहराही लपवते. 'फिल्मीग्यान' पेजवर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.


यानंतर नेटकऱ्यांनी लगेच प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. "ही कोकिलाबेन वाटतेय", "ओळखूच आली नाही" अशा टीका सुरू झाल्या. काहींनी मात्र तिचं समर्थन करत, "प्रेग्नंसीनंतर शरीर बदलतं, ती अजूनही जिम करत आहे, हे महत्वाचं आहे" असंही म्हटलं.


२०२२ मध्ये बिपाशाने मुलीला जन्म दिला होता, तिचं नाव 'देवी' आहे. तिने सोशल मीडियावर अनेकदा पती करणसिंह ग्रोवरसोबत आणि लेकीसोबतचे आनंदाचे क्षण शेअर केले आहेत.


सध्या बिपाशा चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. ती शेवटची २०१८ मध्ये ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती.

Comments
Add Comment

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या

दीपिकाच्या रंगावर प्रश्नचिन्ह? ध्रुव राठीच्या व्हिडीओने उडवली बॉलीवूडमध्ये खळबळ

मुंबई : गोरे रंग पे ना इतना गुमान कर…’ हे गाणं अनेकांना परिचित आहे. मात्र सध्या बॉलीवूडमधील गोऱ्या रंगामागचं

तरुणाईत अक्षय खन्नाची क्रेझ, चाहत्यांसाठी २०२५ ठरले खास

मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूड विश्वात एक चेहरा सक्रिय आहे. मात्र त्याच्या आजवरच्या भुमिकांमुळे तो चर्चेत आला

वेब सीरिज विश्वातील २०२५ चा नवा चेहरा, लक्षवेधी ठरलेला 'जयदीप'!

भारतीय वेब सिरीज वर्षानुवर्षे वेगाने वाढत आहेत. चित्रपट, नाटकांप्रमाणेच वेब सिरीज आता भारतीयांच्या मनोरंजनाचा

सलमान खानचा ‘बॅटल ऑफ गलवान’ — जिद्द आणि शौर्याची अढळ कहाणी

सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ — हिम्मत आणि वीरतेने सजलेली गौरवाची कहाणी, टीझर झाला रिलीज आपल्या वाढदिवसाच्या