Thane Corona News : ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण; घरीच उपचार सुरु

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.



कोरोना रुग्ण आढळण्यास सुरूवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण स्थितीची माहिती घेतली. शुक्रवारपर्यंत महापालिका क्षेत्रात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी चेतना नितील यांनी या बैठकीत दिली. त्याचबरोबर, सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत, असेही त्यांनी सांगितले.


तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. आरटीपीसीआरची सुविधाही कळवा येथे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

HDFC Bank Update: दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या कर्ज पुरवठ्यात लक्षणीय वाढ

प्रतिनिधी: एचडीएफसी बँकेने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील आर्थिक माहिती एक्सचेंजला दिली आहे. त्यातील

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या