आजीच्या कुशीत वैष्णवीचं बाळ

  34

वैष्णवीचं बाळ कस्पटेंच्या घरात सुरक्षित


अवघ्या २४ वर्षीय वैष्णवीचा लग्नानंतर दोन वर्षातच दुर्दैवी अंत झाला. पैशाच्या हव्यासापोटी एका लेकीचा बळी गेला. चिमुकला जीव पोरका झाला. त्याचा लवकर ताबा मिळावा, यासाठी माहेरच्यांचा जीव कासावीस होत होता. अखेर पाच दिवसांच्या अश्रूंनंतर वैष्णवीच्या दहा महिन्याच्या बाळाला आजीच्या कुशीत विसावण्याची जागा मिळाली. आमची मुलगी गेली... पण तिची माया परत आली, अशा भावनांनी भारावलेल्या वैष्णवीच्या आई स्वाती कस्पटे यांनी नातवाला मिठीत घेतलं. बाळाला पाहून कस्पटे कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले...


?si=qWXfNHl9mZuFj7HZ

ही कहाणी आहे वैष्णवी शशांक हगवणे या २४ वर्षीय विवाहितेची. जिनं आयुष्यातील सगळी स्वप्नं एका धाग्यात गुंफली. मात्र, १७ मे रोजी तिनं गळफास घेत आत्महत्या केली. ही आत्महत्या नाही, तर छळ करून केलेला घात होता, असा आरोप तिच्या पालकांनी केला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा दहा महिन्यांचा चिमुरडा जनकराजे पोरका झाला. यातील त्रासदायक बाब म्हणजे तिच्या मृत्यूनंतर बाळाचा पत्ता लागू शकत नव्हता. पाच दिवसांपासून त्या बाळाचा ठावठिकाणा नव्हता. अचानक एका अनोळखी व्यक्तीनं बाळाची आजी स्वाती कस्पटे यांना फोन करून तुम्ही शोधत असलेले बाळ माझ्याकडे आहे, असं सांगितलं. हा फोन कॉल म्हणजे अंधारात आशेचा एक टिमटिमता दिवा होता. त्या व्यक्तीनं बाळ घेण्यासाठी बाणेर इथं महामार्गावर बोलावलं. तिथं गेल्यावर चिमुकल्या जनकराजेला आजीच्या स्वाधीन केलं. तो व्यक्ती निघून गेला. बाळ आजी-आजोबांच्या खुशीत सुखरूप आले.


बाळाचे आजोबा अनिल कस्पटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, केवळ आमचं नातवंड नाही, ती आमची वैष्णवी आहे. तिची आठवण, तिची सावली आमच्यासोबत आहे. आम्ही त्याचं बालपण प्रेमानं, काळजीनं फुलवणार आहोत. त्याला आता कोणीही आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही...

Comments
Add Comment

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन