वैष्णवीच्या सासऱ्याला आणि दिराला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी महत्त्वाची अपडेट आली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा या तिघांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पैशांसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला त्रासलेल्या वैष्णवीने गळफास घेत आत्महत्या केली. वैष्णवीचा मृतदेह औंध रुग्णालयात पुढील कायदेशीर कारवाईसाठी आणण्यात आला होता. हे प्रकरण चिघळणार आणि अटक होणार याची जाणीव झाल्यावर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते. पोलिसांनी राजेंद्र आणि सुशीलला २३ मे रोजी मध्यरात्री पुण्याच्या स्वारगेट परिसरातून झोपेतून उठवून पकडले होते. पकडल्यानंतर आज म्हणजेच शुक्रवार २३ मे रोजी दुपारी राजेंद्र आणि सुशीलला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. चौकशीसाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी यावेळी करण्यात आली. कोर्टाने ही बाब विचारात घेतली आणि राजेंद्र आणि सुशीलला २८ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

वैष्णवी मृत्यू प्रकरणात आतापर्यंत १२ जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. वैष्णवीला पती शशांकने पाईपने मारहाण केल्याचे पोलीस तपासातून कळले आहे. पोलिसांनी या प्रकरणाच्या गुन्ह्यात ११८ (२) कलमवाढ केली आहे. मारहाणीचा प्रकार पोलीस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिसांनी कलमवाढ केली आहे. ज्या पाईपने वैष्णवीला मारहाण केली होती तो पाईप जप्त केल्याचे पोलिसांनी कोर्टाला सांगितले.

तपास सुरू आहे. चौकशीतून हाती येणाऱ्या माहितीआधारे पुढील तपास केला जाईल. आरोपींची मदत कोणी केली होती का ? याचाही तपास सुरू आहे. तपासातून हाती येणाऱ्या माहितीआधारे आरोपींविरोधात कलमवाढ होण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. कस्पटे कुटुंबाने वैष्णवीच्या लग्नात हगवणे कुटुंबाला दिलेली फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती