पावसाच्या हजेरीने नालेसफाईतील गाळ गेला वाहून

सफाईच्या कामाचे तीन तेरा वाजल्याने उद्दिष्ट गाठण्याबाबत प्रश्नचिन्ह


मुंबई :मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यातील गाळाची सफाई तसेच मिठी नदीच्या सफाईच्या कामाला मागील एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली असली तरी आतापर्यंत ही सफाई केवळ ६५.४५ टक्के एवढीच झाली आहे.


यंदा पावसाने लवकरच हजेरी लावल्यामुळे नालेसफाईच्या कामाचे तीन तेरा वाजले गेले आहे. नाल्यातील गाळ काढण्यात आल्यानंतर तो गाळ नाल्याच्या शेजारी सुकवण्यासाठी ठेवला जातो. काढलेला गाळ आणि नाल्यातील न काढलेला गाळही या पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने प्रशासनाला गाळ सफाईचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही.



छोट्या व मोठ्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या सर्व नाल्यांमधील गाळाची सफाई ही ६५.४५ टक्के झालेली आहे.


पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्या दरम्यान १० टक्के व पावसाळ्यानंतर १० टक्के अशाप्रकारे नाल्यातील गाळ काढणे अपेक्षित असते. या सर्व नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ९,६१,६८० मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित होते.




  • मुंबईतील एकूण नालेसफाई : ६५.४५ टक्के

  • काढण्यात येणारा अपेक्षित गाळ : ९,६१,६८० मेट्रीक टन

  • काढण्यात आलेला आतापर्यंतचा गाळ : ६,२९,३९३

  • पश्चिम उपनगरातील नालेसफाई : ८७.७२ टक्के

  • मिठी नदीतील सफाई : ४९.९२ टक्के

  • छोट्या नाल्यातील सफाई : ५५.२८ टक्के

  • शहरातील नालेसफाई : ७०.२२ टक्के

  • पूर्व उपनगरातील नालेसफाई : ८६.२१ टक्के

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता