जिंदाल पॉलीफिल्ममधील आग अखेर आटोक्यात

  29

५६ तासांनंतर प्रशासनाला यश


इगतपुरी:मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर ५६ तासानंतर आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. तीन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात भीषण आग लागली होती. जवळपास २५ शहरातील अग्नीशमन दलाचे १०० च्या वर बंब आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते. गुरुवार, दि. २२ रोजी कंपनीच्या परिसरातील असलेल्या मुंढेगाव, शेणवड खुर्द, बळवंत नगर, मुकणे, पाडळी आदी गावातील नागरिकांना गाव खाली करण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. शुक्रवारी काही प्रमाणात आग आटोक्यात आल्यानंतर व धोका कमी झाल्यानंतर गाव सोडून गेलेले नागरिक हळुहळु पन्हा गावात परतताना दिसुन आले. शुक्रवार दि. २३ रोजी शालेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिंदाल कंपनीत भेट देऊन परिसरात पाहणी केली.


यावेळी मंत्री दादा भुसे म्हणाले की, तीन दिवसांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम प्रगतीपथावर सुरु होते. आग आटोक्यात आली असली तरी ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे दोन दिवस धुर बघायला मिळेल, आग पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. दोन वर्षांपूर्वी लागलेली आग आणि आत्ता लागलेल्या आगी मागील नक्की कारण काय, त्याचा तपास केला जाईल. मंत्रालय नोडल अधिकारी, रिलायन्स आणि इतर अनेक विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी येथे उपस्थित आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खबरदारी घेण्यात आली होती का ? आग कशामुळे लागली ? तज्ञ शोध घेतील आणि अहवाल करून तपास केला जाईल. टेक्निकल ऑडिट बाबत माहिती घेतली असता ऑडिट केले अशी माहिती कंपनीकडून मिळाली मात्र चौकशीमध्ये सर्व माहिती समोर येईल, कंपनीकडून ऑडिट केले गेले होते का? नेमकी काय चूक होती त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी होईल.


मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. तिन दिवसांपासून धूर बाहेर पडतोय, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतील तर सर्वेक्षण केले जाईल. फायर ऑडिट जर झाले असेल तर ही दुर्घटना का झाली? दोषी कोण? कायद्यात राहून पुढील सर्व
कारवाई होईल.


कंपनीतील मेटालायझर युनिट १, २, ३ आणि पोलिस्टर लाईन ए, बी, सी, डी पूर्णपणे जळून खाक झाले असून करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रॉफेन गॅस टाकीपासून आगीला लांब ठेवणे गरजेचं होतं त्यात यश आले आहे. आग प्रोफेन टॅंक पासून ५० मीटर अंतरावर आहे. बॉयलर आणि प्रोफाईल टँकवर पहिल्या दिवसापासून कुलिंग प्रक्रिया सुरू केली होती.


कच्चा माल जास्त असल्याने आग वाढली होती त्यामुळे आम्हीं १२ डंपर ४ जेसीबी लावून तो माल बाजूला केला टेक्निकल टीमने व्हेरिफाय केले आहे की टँकचा स्फोट झालाच तर त्याची तीव्रता पाचशे ते सातशे मीटर पर्यंत जाणवेल. मात्र काल रात्रीच आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी यश आले असुन आता परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, अशी माहिती उपविभागीय अधिकारी ओंकार पवार यांनी दिली.


अग्नीशमनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या टिम येथे आल्या होत्या यात नाशिक, एमआयडीसीची टीम होती, आगीचे स्वरूप बघता विविध महापालिकांच्या जसे ठाणे, पिंपरी-चिंचवड, खाजगी कंपन्या जसे रिलायन्सच्या गाड्या आल्या, तसेच एनडीआरएफची टीमही येथे आलेली, सर्वांनी आगीवर नियंत्रण ठेवले, काळजी घेतली यापुढे आग वाढणार नाही.


धुरामध्ये एक्सेस मिळवत शीटवर पाणी मारणे, सुरवातीला धूर होता , पण संधी मिळताच आतमध्ये जाऊन नियंत्रण केले. अशा कंपन्यांनी फायर ऑडिट केले पाहिजे, त्यांनी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी यांच्याकडून इंडस्ट्रियल सेफ्टी ऑडीट केले असेल; पण फायर सेफ्टी ऑडिट पण केले पाहिजे. इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट पण करायला हवे, त्यात त्यांचे अभियंते पण असतात, अशी माहिती महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसचे सहायक संचालक किरण हत्याल यांनी दिली.

Comments
Add Comment

केळ्यांचा भाव घसरला; उत्पादकांना मोठा आर्थिक फटका

जळगाव: काही दिवसापूर्वी २ हजाराच्या वर गेलेला केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांकडून भाविकांना मारहाण

त्रंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे बाहेरगावहून येणाऱ्या

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

‘सुखोई’च्या आवाजाने दिडोंरी थरथरली

घरांच्या काचा फुटल्या २५ किमी परिसरात आवाजाचे पडसाद स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण तलाठी, तहसीलदारांकडून

छगन भुजबळांनी दिला ध्वजारोहणाला नकार? हे आहे कारण

नाशिक: १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा कोण फडकवणार? यावरून राज्यात वातावरण पेटलेले आहे. नाशिक आणि रायगड या दोन

इगतपुरीच्या रिसोर्टमधील कॉल सेंटरवर CBI चा छापा

अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक नाशिक: इगतपुरी येथील रिसोर्टमधून विदेशी नागरिकांना फोन करून