RCB vs SRH, IPL 2025: सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आरसीबीचा ४२ धावांनी लाजिरवाणा पराभव

  66

लखनऊ: इंडियन प्रीमियर लीगच्या ६५ नंबरच्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४२ धावांनी पराभव सहन करावा लागला. त्यांना सनरायजर्स हैदराबादने ४२ धावांनी हरवले. सनरायजर्स हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २३१ धावा केल्या होत्या. आरसीबीसमोर विजयासाठी २३२ धावांचे आव्हान होते. मात्र त्यांना हे आव्हान पेलवले नाही आणि आरसीबीला केवळ ९ बाद १८७ धावाच करता आल्या.


आरसीबीसाठी विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांनी चांगली सुरूवात करून दिली. फिल साल्टने ६२ धावा तर विराट कोहलीने ४३ धावांची खेळी केली. मात्र ही भागीदारी संघाला विजय मिळवून देण्यात पुरेशी ठरली नाही. या दोघांना वगळता कर्णधार जितेश शर्माने २४ धावा केल्या. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरल्याने त्यांना लाजिरवाण्या पराभवास सामोरे जावे लागले. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना लखनऊच्या मैदानावर रंगला होता. हैदराबादने या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ६ बाद २३१  धावा केल्या होत्या.

हैदराबादकडून इशान किशनने तुफानी खेळी केली. इशान किशनने ४८ बॉलमध्ये ९४  धावांची तुफानी खेळी केली. सनरायजर्स हैदराबादची सुरूवात तुफानी झाली. अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्मा ३४ धावा करून बाद झाला. तर हेडला भुवनेश्वर कुमारने बाद केले. अभिषेक-हेड बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेन आणि इशान किशनने डाव सांभाळला. यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी केली. स्पिनर सुयश शर्माने क्लासेनला बाद करत ही भागीदारी तोडली. क्लासेनने दोन षटकार आणि तितक्याच चौकाराच्या मदतीने १२ बॉलवर २४ धावा केल्या.

Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा

आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी