अटक टाळण्यासाठी वैष्णवी हगवणेचा सासरा कुठे कुठे लपला ?

  128

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सात दिवसांपासून फरार असलेला सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या दोघांना पोलिसांनी पकडले आहे. दोन्ही आरोपींना पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून पकडण्यात आले. आरोपींना मध्यरात्री झोपेतून उठवून पोलिसांनी ताब्यात घेतले. याआधी ७ मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह औंध रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आला. या प्रकरणात अटक होईल याची जाणीव झाल्यावर राजेंद्र हगवणे आणि सुशील या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात एन्डेवर कारने आलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील दोघे जाताना तिथून थार घेऊन निघाले होते. नंतर थार मधूनच त्यांनी मुहूर्त लॉन्स, पवना डॅम जवळील बंडू फाटक फार्म हाऊस येथे मुक्काम केला. नंतर थार १८ मे रोजी आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात होती. तिथेही काही काळ मुक्काम झाला.

आरोपींनी १९ मे रोजी थार ऐवजी बोलेरो वापरण्याचा निर्णय घेतला. दोघे पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पळून गेले. सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांनी मुक्काम केला. सेगावहून ते पसरणी मार्गे कोगनळी येथील हॉटेल हेरिटेजमध्ये जाऊन २० मे रोजी थांबले होते. प्रीतम पाटील यांच्या शेतावर त्यांनी २१ मे रोजी मुक्काम केला. पुन्हा २२ मे रोजी ते पुण्यात पोहोचले.

पोलिसांना सतत हुलकवणी देत असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील निवांतपणे हॉटेलमध्ये मटण पार्टी झोडत होते. पोलिसांना आरोपी मटण खात असतानाचे एक सीसीटीव्ही फूटेज मिळाले. या फूटेजच्या मदतीने चौकशी करत पोलीस आरोपींचा माग काढू लागले. अखेर दोन्ही आरोपींना पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून मध्यरात्री पकडण्यात आले. आरोपींना मध्यरात्री झोपेतून उठवून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता, नणंद करिष्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील या पाच जणांना अटक केली आहे.
Comments
Add Comment

जरांगेंच्या नेतृत्वात हजारो समर्थक मुंबईत धडकणार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यासह हजारो समर्थकांचे मोर्चा उद्या, शुक्रवारी मुंबईत

शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला

संगमनेर : संगमनेर विधानसभेचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी ७.४०

प्रधानमंत्री जन धन योजनेत महिलांची ५६ टक्के भागीदारी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री जन धन योजनेला गुरुवारी ११ वर्ष पूर्ण झाली. ही योजना २८ ऑगस्ट २०१४ रोजी सुरू करण्यात आली

'राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला'

नवी दिल्ली : राष्ट्रीय हितासाठी तीन मुलं जन्माला घाला. हम दो हमारे तीन, हे धोरण राष्ट्रीय हितासाठी अवलंबिले

नवे सहकार धोरण देशात परिवर्तन घडवेल!

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला भारत देश वेगाने प्रगती करतं आहे. समाजातील सर्व घटकांचा

'राज को राज रहने दो' असं का म्हणाले एकनाथ शिंदे ?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन