मान्सूनपूर्व घरांच्या छप्पर दुरुस्तीला वेग

घरांवर ताडपत्री, लाकुडफाटा भरण्याची घाई


मोखाडा :मान्सूनचे आगमन काही दिवसांवर आल्याने शहरासह ग्रामीण भागात पावसाळापूर्व कामांची गती वाढली असून कामांना वेग आला आहे.सध्या मान्सूनपूर्व पाऊस सायंकाळच्या वेळेला वीज, वारा यांच्यासह हजेरी लावत आहे.दरम्यान या पावसात आपल्या घरात कुठे गळतंय यासाठी घराच्या डागडुजी सह प्लास्टिक ताडपत्री टाकणे, जुनी कौलं काढून नवीन कौलं टाकणे,पावसाळ्यात जनावरांसाठी वैरण, लाकुडफाटा गोळा करून ठेवणे इत्यादी कामाची घाई तालुक्याच्या ग्रामीण भागात होताना दिसत आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश घरे कौलारू आहेत तर काही घरांवर सिमेंटचे पत्रे असतानाही पावसाळ्यात पाणी गळते यामुळे या घरांवर तसेच जनावरांचा चारा खराब होऊ नये म्हणून आच्छादनासाठी विविध प्रकारच्या प्लास्टिकचा वापर पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी होताना दिसत आहे.रोहिणी नक्षत्र सुरू होण्यास अवघे दोन तीन दिवस राहिले असून हवामान खात्याने सुद्धा येत्या काही दिवसांत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केलेला असल्याने वारा, वादळ आणि जोरदार पावसापासून वाचण्यासाठी, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी मान्सून पूर्व कामांना ग्रामीण भागात वेग आला आहे.घरांवर आच्छादन टाकण्यासाठी बाजारात प्लास्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक येत आहेत तर काही ग्रामस्थांनी आपल्या घरांवरील जुनी कौलं काढून त्या जागी नवीन कौल टाकण्याची लगबग सुरू केली आहे. छतावरील पाणी गळती थांबविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्लास्टिकच्या दरात जरी वाढ होत असली तरी पावसाळ्यात पावसापासून संरक्षण देणाऱ्या आवश्यक प्लास्टिक व ताडपत्री विकत घेऊन घरांची डागडुजी करण्याची लगबग ग्रामीण भागात वाढली आहे.
Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील