शेतकऱ्यांना पीक कर्ज माफीची आस

  57

वाडा : सध्या पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून खरीप हंगामातील पीक कर्जाची उचलही केली आहे. तर काहींची घेण्याची प्रक्रिया सुरू आहे; परंतु सत्ताधाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कर्जमाफी होईल, ही अशा असलेल्या शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. त्याचा परिणाम यंदा पीक कर्जाच्या नूतनीकरणावर होण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात सेवा सहकारी सोसायटीमार्फत ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. काहींना तांत्रिक अडचणीमुळे पीक कर्ज वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होते. शेतात पेरणी केल्यानंतर कधी पाऊस दगा देतो, तर कधी अतिवृष्टीचा तडाका बसतो. अनेकदा नुकसानीचा सामना करावा लागतो. अशावेळी पीक कर्जही थकीत पडते. थकीत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडचणी येऊन सावकाराचे दार त्यांना ठोटावे लागते.


खरीप हंगामासाठी पीक कर्ज हवे असलेल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.जे शेतकरी नियमित कर्ज उचल करतात ते शेतकरी बँकांमध्ये जाऊन नूतनीकरण करीत आहेत. काही लवकरच शेतकऱ्यांना कर्ज वितरण केले जाणार आहे. गतवर्षी ठाणे व पालघर जिल्ह्यातील ४४ हजार २८७ सभासदांना ४२,७०५.२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी तीनशे अठरा कोटी आठ लाख रुपयांचे कर्ज वाटप ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे. शासकीय लक्षात काची ७९ टक्के पूर्तता करण्यात आली आहे.


यंदा होती कर्जमाफीची अपेक्षा


विधानसभा निवडणुकीतील घोषणेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. त्यामुळे थकीतदार तसेच नियमित कर्ज फेड शेतकऱ्यांनी केली नाही. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील शेती संस्थेची व ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या थकबाकी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. बँकेच्या शेती कर्ज थकबाकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६ कोटी ४६ लाखांची वाढ झाली आहे. ७,३३१ नवीन शेतकऱ्यांनी कर्ज उचलले आहे. या हंगामासाठी १४ मे पर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ३३१ शेतकरी सभासदांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ५५ कोटी चार लाखांचे पीक कर्ज वाटप केले आहे.


२६,५७२ शेतकऱ्यांनीच केले कर्जाचे नूतनीकरण


गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील २६,५७२ सभासदांनी त्यांच्याकडील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अल्प मुदत कर्जाची परतफेड मुदतीत केली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सभासद नवीन कर्ज घेण्यास पात्र झाले आहेत.


१०३ संस्था एनपीए वर्गवारीत


ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेती संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करीत आहे. ३९९ शेती संस्था पैकी १०३ संस्था एनपीए वर्गवारीत आहेत. संस्थांकडे ठाणे जिल्हा सहकारी बँकेची ११३ कोटी ९१ लाख एनपीए आहे. त्यामुले बँकेच्या एकूण एनडीएच्या ३०.५२ टक्के इतके प्रमाण आहे. वर्षीच्या तुलनेत शेती कर्जाच्या एनपीए मध्ये आठ कोटी ३७ लाख रुपये वाढ झाली आहे.


विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ही अशा फोल ठरली. अनेकांनी कर्ज न भरल्याने नवे पीक कर्ज मिळण्यास अडचण होत आहे.
- किशोर पाटील, चेअरमन, देवघर सेवा सहकारी सोसायटी

Comments
Add Comment

वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या

आरक्षण बदलाचा ‘गेम’ सर्वाधिक चर्चेत

पवार, रेड्डींचा मोठा प्रताप फसला गणेश पाटील विरार : बांधकाम परवानगी देताना लाच स्वीकारण्यासाठी 'रेट' ठरवून मलिदा

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने