देवळा नगरपंचायतीची प्लास्टिक पिशवी कारवाई

  21

देवळा : स्वच्छ सर्वेक्षण २०२५, माझी वसुंधरा ५.० अंतर्गत व एकल वापर प्लास्टीक बंदी अंमलबजावणी मोहीम अंतर्गत देवळा शहरात प्लास्टीक जप्तीची कारवाई करण्यात आली. यात २० किलो प्लास्टीक देवळा नगरपंचायतीने विविध विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आले असून रुपये ४०००/-इतका दंड दुकानदारांकडून वसूल करण्यात आला. ही मोहीम सुरुच राहणार असून प्लास्टीक वितरण व वितरक दुकानदारांवर यापुढे अजून कठोर कारवाई करण्यात येईल, असे देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी कळविले आहे.


एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून एकल वापर प्लास्टीक बंदी अंमलबजावणी मोहीम राबविण्याच्या सूचना आहेत. या अनुषंगाने देवळा नगरपंचायतीने सदर मोहीम राबविली. यात शहरातील विक्रेते, फुलविक्रेते, स्थानिक बाजारपेठेत, भाजीपाला मंडई दुकाने या ठिकाणी एकल वापर प्लास्टिक जप्ती व बंदी करण्याची मोहीम राबविली. या तसेच एकल वापर प्लास्टिक वापर न करण्याबाबत मार्गदर्शनपर सुचना देण्यात आल्या आहेत.


ही मोहीम कायमस्वरूपी सुरू राहणार असून प्लास्टीक वितरण व वितरक दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे नगरपंचायतीने कळविले आहे. ही कारवाई मोहीम मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर, यांच्या मार्गदर्शनानुसार,स्वच्छता निरीक्षक अजय बच्छाव, कार्यालयीन अधीक्षक पवन कस्तुरे, लेखापाल नितीन भवर , कर निरीक्षक जनार्दन येवले , शहर समन्वयक दिग्विजय देवरे, लेखापरीक्षक जुगल घुगे, शरद पाटील, विकास आहेर,व वसुली कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने राबवली.

Comments
Add Comment

ना. भुजबळांकडून लासलगावी पुलाच्या कामाची पाहणी

मुख्य बाजारपेठेतील पुलाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश लासलगाव : लासलगाव पाटोदा रस्त्यावरील

गंगापूर धरणातून विसर्ग वाढला ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेले चार पाच दिवसात पावसाची संततधार कायम असल्याने , जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा

कांदासाठा घोटाळ्यावर हायकोर्टाची तत्काळ कार्यवाही

विश्वासराव मोरे यांच्या याचिकेला ऐतिहासिक यश पिंपळगाव : गेल्या दहा वर्षांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या

बडगुजर यांचा प्रवेश; काही पेच, काही संदेश

नाशिक बीट‌्स : प्रताप म. जाधव उबाठातून भाजपात स्वागत करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाच्या

आता शिवसेनाप्रमुखांना अनुभवताही येणार!

गंगापूर रोडवरील स्मृती उद्यानात साकारणार ‘थ्रीडी होलोग्राम’ नाशिक : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या

बेकायदेशीर निविदा प्रक्रिया राबवून एक कोटींचा अपहार; कार्यकारी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक : खोटे दस्तऐवज तयार करून निविदा तयार करून बेकायदेशीरपणे निविदा प्रक्रिया राबवून शासनाच्या एक कोटी