New Wave of Covid : भारतात पुन्हा कोरोनाची लाट?

नको निष्काळजीपणा, सतर्क राहा


कोरोनाच्या कटू आठवणी आजही नकोशा वाटतात. कोरोनामुळे खूप काही गमावलंय. अगदी आपल्या घरातल्यांपासून ते नातेवाईकांपर्यंत. सूमसाम रस्ते, ओस पडलेली कार्यालयं, शाळा - महाविद्यालयं बंद. आज पुन्हा तशीच परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे. देशावर पुन्हा कोरोनारुपी वादळाचं संकट घोंघावतंय. वेगाने पसरणाऱ्या या कोरोनापासून कसं सुरक्षित राहाला आणि कशी काळजी घ्यावी, हे पाहूया या लेखातून...


कोरोना परततोय. होय. २०२० मधल्या कोरोनाच्या कटू आठवणी अद्याप ताज्या आहेत. आपण जवळच्या माणसांना गमावलं. उपचार मिळत नव्हते. ऑक्सिजनचा तुटवडा होता. कोण कुणाशी बोलत नव्हतं. डोळ्यांसमोर माणसं डोळे मिटत होती. त्यांचं अंत्यदर्शनही घेता येत नव्हतं. असा हा कोरोना पुन्हा पसरतोय. JN.१ व्हेरियंट येतोय. याचा वेग गेल्या वेळच्या कोरोनापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो वेगाने पसरतोय. गर्दीच्या ठिकाणांना धोका निर्माण झालाय. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांना या नव्या कोरोना व्हेरियंटचा धोका जास्त आहे. गेल्या आठवडाभरापासून चीनच्या हाँगकाँग आणि सिंगापूर या शहरांमध्ये कोरोना हातपाय पसरायला लागलाय. या शहरांमध्ये आठवडाभरात जवळपास १४ हजारांवर कोविडचे रुग्ण वाढले. रुग्णवाढीचा वेगही जवळपास दुप्पट आहे.त्यामुळे पुन्हा महामारीचा सामना करण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होतेय. या शहरांमध्ये उपाय म्हणून मास्क वापरायच्या सूचना आरोग्य खात्याने दिल्यात. नव्या कोरोना व्हायरसचा वाढता वेग पाहता सर्वांचं टेन्शन वाढतंय.



गेल्या कोरोनामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी बूस्टर डोसचाही वापर करण्यात आला. मात्र ज्यांनी हा बूस्टर डोस घेतला यांचं प्रमाण हे २० ते २२ टक्केच आहे. २०२० मधील कोरोना हा उन्हाळ्यात वाढायचा. म्हणजे एप्रिल, मे आणि जूनच्या सुरुवातीला कोरोना डोकं वर काढायचा. मात्र JN.१ हा नवीन व्हेरियंट वातावरण बदललं तरीही पसरतो, असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. त्यामुळे JN.१ हा जास्त धोकादायक ठरतो.



आता पाहूयात नवीन JN.१ व्हेरियंट म्हणजे काय ?


JN.१ हा Omicron व्हेरियंटचा नवीन उपप्रकार

आधीच्या कोरोनापेक्षा जास्त वेगाने पसरतो

रुग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळतात

 WHOकडून Variant of Interest म्हणून घोषित आहे.





आता पाहूयात JN.१ ची लक्षणं


घशात खवखव होणे, कोरडा किंवा ओलसर खोकला, थकवा, अशक्तपणा, सर्दी, शिंका, नाक वाहणं, डोकेदुखी, अंगदुखी, सौम्य स्वरुपाचा ताप, श्वास घेताना थोडा त्रास होणं, अन्नाची चव कमी होणं, अन्न खाल्ल्यावर उलटी किंवा अतिसार, त्वचेला चट्टे उठणे आणि डोळ्यात जळजळ होणे.



नव्या व्हेरिएंटचे उपाय



  • वैयक्तिक स्वच्छता आणि सतर्कता

  • हात साबणाने धुणं

  • अल्कोहोल-बेस्ड सॅनिटायझरचा वापर करणं

  • चेहरा, नाक, डोळ्यांना वारंवार स्पर्श न करणं

  • मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं

  • बोलताना एकमेकांपासून अंतर ठेवणं

  • सार्वजनिक कार्यक्रम टाळणं

  • सिनेमाघरात जाताना खबरदारी घेणं

  • लसीकरण आणि बूस्टर डोस घेणं


JN.१ या कोरोना व्हेरियंटपासून सुरक्षित राहायचं असेल तर लसीकरण महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बुस्टर डोस घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. आयुर्वेदिक उपचार करूनही रोगप्रतिकारशक्ती वाढवता येत. योग आणि प्राणायाम केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो.



रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे आयुर्वेदिक उपाय



  • दुधातून हळद घेणं

  • तुळस, गवती चहा

  • आल्याचा काढा

  • अश्वगंधा


कोरोनाची लक्षणं जाणवली तर नेमकं काय कराल तेही पाहूयात.


RT-PCR चाचणी त्वरित करा.


होम आयसोलेशन पाळा, मास्क वापरा.


ताप, खोकला वाढल्यास डॉक्टरांकडे जा


कोरोनाची लक्षणं जाणवली तर पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. स्वत:हून उपचार करू नका. एकूणच JN.१ सारखे नवीन व्हेरियंट्स वेळोवेळी येतच राहतील, मात्र त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण सजग, सतर्क राहणं आवश्यक आहे. लसीकरण, स्वच्छता, मास्क आणि जागरुकता हेच बाळकडू आपल्याला कोरोनाच्या लाटेत सुरक्षित ठेवू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कमेंट्समध्ये नक्की कळवा.. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, धन्यवाद.


Comments
Add Comment

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा

बिहारची तरुण आमदार होणार २५ वर्षांची मैथिली ठाकूर, निवडणुकीत ११,७३० मतांनी विजयी

Biharelection2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर मतदारसंघाने या वेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कारण

बिहारमध्ये भाजपचा दणका: मुख्यमंत्री कोण होणार? आता एनडीएचा 'हा' मोठा निर्णय!

तावडे म्हणाले, 'वॅकन्सी' नव्हती, हा जातीच्या पलीकडचा विजय! पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मिळवलेल्या