Chhonzin Angmo: "अनंत आमुची ध्येयाशक्ती..." दृष्टिहीन आदिवासी महिलेने केले माऊंट एवरेस्ट सर

छोंझिन अंगमोची कमाल, दिसत नसताना सर केला माउंट एव्हरेट


हिमाचल प्रदेश: ध्येयवेड्या व्यक्तीला आपले ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही अडचणी किंवा बंधने रोखू शकत नाही.  अथक परिश्रमाच्या बळावर या व्यक्ती समाजासमोर आदर्श निर्माण करतात. यावर आधारित 'कोलंबसाचे गर्वगीत' ही कवी कुसुमाग्रजांची कविता मराठीत प्रचलित आहे. तर अशा अनेक ध्येयवेड्या व्यक्तींची असामान्य कामगिरी आपण ऐकली आणि पाहिली असेल. तर त्यात आता हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील एका दुर्गम गावात राहणाऱ्या एक अंध आदिवासी महिलेचा देखील समावेश झाला आहे.  या महिलेचे नाव छोंझिन अंगमो (Chhonzin Angmo) असे असून, माऊंट एव्हरेस्ट करणाऱ्या या महिलेने तिच्या ध्येयाच्या मार्गात तिच्या दृष्टीदोषाला अडथळा येऊ दिला नाही. कारण, जगातील सर्वात उंच पर्वत सर करत भारताचा तिरंगा फडकवणारी अंगमो पहिली दृष्टिहीन भारतीय महिला ठरली आहे. (First Visually Impaired Woman to Summit Mount Everest)



माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय दृष्टिहीन महिला आणि जगातील पाचवी व्यक्ती


अंगमोने जे करून दाखवले आहे ते इतर सामान्य व्यक्तीला करणे देखील खूपच कठीण आहे. तिने , सोमवारी जगातील सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकवत माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातील पहिली दृष्टिहीन महिला आणि जगातील पाचवी व्यक्ती बनून इतिहास रचला आहे.



वयाच्या आठव्या वर्षी दृष्टी गेली


भारत-तिबेट सीमेवरील दुर्गम चांगो गावात जन्मलेल्या अंगमोची वयाच्या आठ वर्षांची असताना दृष्टी गेली. तरीही तिने दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊसमधून पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. सध्या ती दिल्लीतील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ग्राहक सेवा सहयोगी म्हणून काम करते. अंगमोचे वडील अमर चंद यांनी आपल्या मुलीने केलेल्या कामगिरीचे कौतुक करताना म्हंटले, "मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतो आहे आणि तिच्या कामगिरीबद्दल आम्ही सर्वजण खूपच आनंदी आहोत.  मात्र, आम्हाला अद्याप त्याचा अचूक तपशील माहित नसल्यामुळे आम्ही तिच्या परत येण्याची वाट पाहत आहोत." अंगमोने जगातील सर्वात उंच शिखर सर केल्याच्या बातमीने तिच्या गावातील स्थानिकांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.


एव्हरेस्ट शिखर सर करण्यापूर्वी अंगमोने पीटीआयला सांगितले होते की, "माझी कहाणी आताच सुरू झाली आहे, माझे अंधत्व ही माझी कमजोरी नाही तर माझी ताकद आहे. पर्वत शिखरे चढणे हे माझे बालपणीचे स्वप्न होते पण आर्थिक अडचणी हे एक मोठे आव्हान होते. मात्र, आता मी सर्व शिखरे सर करणार आहे," असे ती म्हणाली होती.


Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला