वणीत तिरंगा रॅलीत देशभक्तीचे अनोखे दर्शन

  29

वणी : ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत नागरिकांनी देशभक्तीचे अनोखे दर्शन घडवित उस्फूर्त प्रतिसाद दिला. राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्करातील शूर जवानांच्या सन्मानार्थ वणी येथे तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध समाजघटक, संस्था, संघटनांंचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सहभाग घेत देशप्रेम व एकतेचा संदेश दिला. रॅलीत डिजेवर देशभक्तीपर लावलेली गिते व भारतमाता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान' च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. रॅली देवी मंदीर चौक, शनि मंदीर, महाराणा प्रताप चौक, शिंपी गल्ली, संताजी चौक, पोलिस स्टेशन, बसस्थानक मार्गे काढण्यात येवून छत्रपती संभाजी महाराज चौकात सांगता झाली. यावेळी भारतीय लष्कराने राबवलेल्या ऑपरेशन सिंदुरची माहिती देत संताजी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख, उपसरपंच विलास कड, प्रवीण बोरा यांनी माहिती देत भारतीय लष्कराचे अभिनंदन केले. रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक दिलीप चौधरी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे यांचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव केला. राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीची सांगता झाली. रॅलीत उपसरपंच विलास कड, वमकोचे अध्यक्ष महॆंद्र बोरा, भाजपाचे वणी मंडल प्रमुख वसंत कावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाप्रमुख राजेंद्र उफाडे, आदिवासी बचाव अभियानाचे प्रमुख प्रा. अशोक बागूल, किरण गांगुर्डे, बाळासाहेब घडवजे, प्रवीण दोशी, दिगंबर पाटोळे, अनिल गांगुर्डे, किशोर बोरा, नितीन झोटिंग, शाम मुरकुटे, कदम, बाळासाहेब देशमुख, ज्योती देशमुुख, कृष्णा मातेरे, सचिन कड, तुषार शर्मा, नामदेव पैठणे, रितेश पारख आदीसंह शेकडो देशप्रेमी सहभागी झाले होते.

Comments
Add Comment

स्ट्रॉबेरी पिकाचा पीक विमा योजनेत समावेश

कळवण : कळवण तालुक्यातील पश्चिम पट्टा आणि सुरगाणा तालुक्यातील घाटमाथा तसेच गुजरात सीमेलगतच्या सापुतारा

'मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी काँग्रेसने माफी मागावी'

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका

केळीच्या बागांत राहणाऱ्या वाघांना ओळख देण्यात वनविभागाचे अपयश

अनेर - मेळघाट काॅरीडॉर प्रकल्प प्रलंबितच… विजय पाठक जळगाव : जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने वन्यजीव संरक्षण

नाशिक मनपा घेणार आणखी तीनशे कोटींचे कर्ज

महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका तयारीला

इगतपुरीतील तीनलकडी पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त

इगतपुरी : इगतपुरी शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील तीनलकडी पुलाची दुरवस्था झाली असून, या पुलावर मोठ्या

दहिवडमध्ये बिबट्या जेरबंद

नागरिकांमध्ये भीती कायम; आणखी पिंजऱ्यांची मागणी देवळा : देवळा तालुक्यातील दहिवड येथील लवखाड मळ्यामध्ये अनेक