वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणेने आत्महत्या केली. पण वैष्णवीच्या मृत्यूला तिच्या सासरची माणसंच कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याच्या बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हगवणे कुटुंबाचा पक्षाशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नाहीत, असेही ते म्हणाले.

वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी हगवणे कुटुंबातील चौघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी तीन आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

वैष्णवीचा मुलगा जेमतेम नऊ महिन्यांचा आहे. नातवाचा ताबा घेण्यासाठी गेले त्यावेळी निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने पिस्तुल दाखवून धमकावले, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. वैष्णवीच्या मृत्यूला आठवडा उलटला तरी नातवाचा ताबा मिळालेला नाही. आता नातवाला सुरक्षितरित्या ताब्यात देण्याची जबाबदारी पोलिसांनी त्यांच्या शिरावर घ्यावी, अशी भूमिका वैष्णवीच्या वडिलांनी जाहीररित्या घेतली आहे.

वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली तरी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांकरिता वैष्णवीच्या सासरच्यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. पती शशांक हा वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. वारंवार वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता.
Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग