कामचुकार कंत्राटदारांना दंड आकारा, पालकमंत्री आशिष शेलार यांचे पालिकेला निर्देश

मुंबई : कंत्राटदारांनी ज्या पद्धतीने रस्त्यांच्या कामाचं नियोजन केले पाहिजे होत, ते केलेले दिसत नाही. जे कंत्राटदार काम करत नाही, त्यांच्यावर दंड लावण्यात यावा असे निर्देश दिलेत, असे मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत आमची जबाबदारी म्हणून आम्ही प्रत्येक गल्लोगल्ली फिरू, आमच्या भूमिका सरकारला सांगू आणि काम करुन घेऊ,असेही त्यांनी सांगितले.


उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी पूर्व उपनगरातील रस्ते बांधणी कामाचा पाहणी दौरा केला. मुंबई पूर्व उपनगरातील  घाटकोपर येथील एम. पी. वैद्य मार्ग  ते टिळक रोड जंक्शन या रस्त्याची पाहणी करताना असे निदर्शनास आले की, गेली ६ महिने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पहाटे सिमेंट काँक्रिट टाकण्यात आले आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी  तक्रार केली. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर सोबत होते. ही सर्व परिस्थिती आणि नागरिकांचा रोष त्यांच्या लक्षात आणून दिला आणि तातडीने या सर्व बाबतीत सुधारणा करा अशा सूचना मंत्री शेलार यांनी केल्या.


एस वॉर्डमधील भांडूप पश्चिम येथील अशोक केदारे चौक आणि टेंभी पाडा रस्त्यांच्या कामांची पाहणी केली.  या ठिकाणी रस्त्यांचे काम अपूर्ण असून, केवळ अर्धे काँक्रिटीकरण झाले आहे आणि रस्त्याची लेव्हल देखील योग्य केलेली नाही, अशी गंभीर स्थिती निदर्शनास आली. स्थानिक भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनी कंत्राटदाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.


या दौऱ्यात आमदार पराग शाह, आमदार मिहिर कोटेचा, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, प्रकाश गंगाधरे, नील सोमैया, भालचंद्र शिरसाट, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो-३ च्या वेळापत्रकात १५ सप्टेंबरपासून बदल

मुंबई : मुंबई मेट्रो-३ या शहरातील अॅक्वा लाईनने नुकतेच सुधारित सेवा वेळापत्रक जाहीर केले आहे. आज सोमवारपासून

दिवाळीनिमित्त जादा बसगाड्या सोडणार

मुंबई : दसरा दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे राज्यभरात

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात