कोण आहे ही इंदोरमधील डॉक्टर
इंदोरमधील एका डॉक्टरने कान्सच्या रेड कार्पेटवर बरीच प्रसिद्धी मिळवली. ती म्हणजे डॉ. निकिता कुशवाह. निकिता मिसेस युनिव्हर्स २०२४ ची पहिली रनरअप राहिली आहे. जेव्हा निकिता तिच्या ब्लश पिंक गाऊनमध्ये रेड कार्पेटवर दिसली तेव्हा तिने सर्वांचेचं लक्ष वेधून घेतले. तिने जॉली पॉली कॉउचर गाऊन घातला होता ज्याची किंमत सुमारे २० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
५ व्या शतकातील जहाजाचे नवे रूप! मुंबई : भारतीय नौदलाच्या वतीने कारवार इथल्या नौदल तळावर प्राचीन शिलाई तंत्राने बांधलेल्या जहाजाचा (Ancient Stitched Ship) ...
तिचा कान्समध्ये असलेला लूक
निकिता ही इंदूरची रहिवासी आहे आणि ती व्यवसायाने हृदय आणि श्वसन फिजिओथेरपिस्ट (कार्डियक और रेस्पिरेटरी फिजिओथेरेपिस्ट) आहे. तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या व्हिएतनाम एडिशनमध्ये डेब्यू केला होता. या एडिशनमध्ये भारताच्या प्रतिभेबद्दल आणि सामाजिक समस्यांबद्दल चर्चा केली.निकिताचा संपूर्ण लूक ‘फेअर गॉडेस ऑफ स्प्रिंग’ या गाऊन थीमवर होता. हा आकर्षक फ्लेयर्ड आणि ट्रेल गाऊन बनवण्यासाठी तीन महिने लागले. एवढेच नाही तर ते बनवण्यासाठी ५० कारागिर लागले होते.निकिताच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर बरेच लोक तिला डिज्नी प्रिन्सेस म्हणत आहेत.
दागिने
तिने तिचा आकर्षक ट्रेल गाऊन हिऱ्यांच्या दागिन्यांसह परिधान केला होता. यामुळे तिचा एकंदरीत लूक अगदी परिपूर्ण दिसतोय. निकिता २०२४ पासून लोकांमध्ये चर्चेत होती. तिने दक्षिण कोरियामध्ये झालेल्या सौंदर्य स्पर्धा मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत १०० हून अधिक देशांतील लोकांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये ती पहिली उपविजेती ठरली.