Maharashtra School: राज्यातील ७५० शाळा बंद पडण्याचा धोका

पुणे: शालेय शिक्षण विभागाने संच मान्यता निकषांत बदल केल्यामुळे राज्यातील २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना शिक्षक मिळणार नाहीत. त्यामुळे शिक्षकांअभावी राज्यातील सुमारे ७५० शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे,’ असा दावा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केला.

संघाचे सचिव नंदकुमार सागर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष शिवहार लहाने, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी राजेश गायकवाड, विठ्ठल माळशिकारे, प्रवीण गायकवाड, प्रसाद गायकवाड उपस्थित होते.

राज्यातील आठ हजारांहून अधिक गावे शिक्षण सुविधेपासून वंचित आहेत. या गावांमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपलब्ध नाही. सुमारे ६५६३ गावांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय नाही, तर १६१० गावांमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी शाळाच नाहीत. अशी परिस्थिती असूनही शालेय शिक्षण विभागाने संच मान्यता निकषांमध्ये बदल करून २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर एकही शिक्षक मंजूर न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्यातील सुमारे ७५० शाळा बंद पडण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Nashik : महापौर-उपमहापौरांकडून रस्ते व विकासकामांची पाहणी

नाशिक : नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित आणि सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा व वेग तपासण्यासाठी आज

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला बीडमध्ये भीषण अपघात

बीड : बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या

Sharad Pawar : अजित पवारांच्या मृत्यूनंतर पवार कुटुंब पहिल्यांदाच एकत्र

पुणे : अजित पवारांच्या मृत्यूवेळी पवार कुटुंब एकत्र आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यानंतर अनेक राजकीय घटना

लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, तिघांचा जागीच मृत्यू, मृतांमध्ये ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

Amravati accident : अमरावती जिल्हातील वरूड-मोर्शी महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. खडका फाट्याजवळ

नाशिकमध्ये ACB ची मोठी कारवाई, जिल्हा परिषदेचे तीन अधिकारी लाच स्वीकारतांना जाळ्यात

नाशिक Nashik : नाशिकमध्ये ACB पथकाने मोठी कारवाई करत जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ

क्रिकेटची मॅच संपली अन् दोन्ही गट भिडले ; भर मैदानात सांडला रक्ताचा सडा, नेमकं काय घडलं ?

जळगाव : क्रिकेटचं मैदान म्हणजे दोन गट आमने सामने असणारच. इंटरनॅशनल मॅच असो वा गल्लीतल्या पोरांची मॅच, भांडणं