मटकी-भेळ टॉर्टिया बाईट्स

  33

सुग्रास सुगरण गायत्री डोंगरे


मराठी घरात भेळ म्हणजेच चवदार, तिखट-गोडसर आणि थोडा आंबट असा चवींचा धमाका. त्यात जर मटकीसारखा पौष्टिक आणि पारंपरिक घटक घालायचा तर रेसिपी केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यदायीही होते.
टॉर्टिया चिप्सचा कुरकुरीतपणा आणि दही-साखर-शेवच्या सौम्यतेने याला एक ग्लोबल टच मिळतो, ज्यामुळे पारंपरिक भेळ अधिक आकर्षक आणि सगळ्यांसाठी सहज खाण्यायोग्य होते. ही रेसिपी पाहुण्यांना दिल्यास, तुम्हाला सोपी, पौष्टिक आणि डिश खाऊ घातल्याचा आनंद
नक्कीच मिळेल.




  • साहित्य :

    मोड आलेली मटकी १ कप




  • तुकडे केलेला कांदा १ मध्यम




  • बारीक चिरलेला टोमॅटो १ मध्यम




  • कोथिंबीर (चिरलेली) २ टेबलस्पून




  • चिंच-गूळ चटणी (मिठ्ठी-आंबट मिश्रण ३-४ टेबलस्पून




  • दही (फेटलेले) १/२ कप




  • टॉर्टिया चिप्स / पापडी १ मोठा वाटी




  • शेव १/४ कप




  • मीठ आणि मिरची पूड चवीनुसार




कृती : मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात १५-२० मिनिटं शिजवा.(मऊसर होईपर्यंत).
एका मोठ्या वाडग्यात उकडलेली मटकी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घाला. त्यात मीठ, मिरची पूड आणि चिंच-गूळ चटणी मिसळा.
फेटलेले दही हळूवारपणे भेळ मिश्रणात घाला आणि नीट मिक्स करा. दही मिक्स केल्याने चव सौम्य आणि थोडीशी थंडसर होते.
सर्व्हिंग प्लेटमध्ये टॉर्टिया चिप्स (किंवा पापडी) थोडीशी ठेवून त्यावर तयार भेळ चा एक चमचा थोडक्यात ठेवा.


सजावट :





  • भेळवर शेव घाला. शेवमुळे कुरकुरीतपणा येतो पदार्थ सुंदर दिसतो.




  • टॉर्टिया bites पटकन सर्व्ह करा, अन्यथा चिप्स मऊ पडू शकतात.




  • पौष्टिकता आणि फायदे:




  • मटकी: प्रथिने आणि फायबरने समृद्ध, पचनासाठी मदत करणारी.




  • चिंच-गूळ चटणी: नैसर्गिक स्वीटनर व आंबटसर चव देणारी, जी पचन सुधारते.




  • दही: प्रोबायोटिक्सचा उत्तम स्रोत, पचनाला सुधारणा.




  • टॉर्टिया चिप्स: कमी तेल वापरून किंवा घरच्या बनवलेल्या वापरल्यास अधिक पौष्टिक.




  • टिप्स : घरगुती टॉर्टिया चिप्स करायचे असल्यास, गहू किंवा मक्याच्या तांदळाच्या पिठापासून तयार करावे.



Comments
Add Comment

हर तन तिरंगा

तिरंगी फॅशन ट्रेंड!  सौंदर्य तुझं : प्राची शिरकर स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव!

दिव्यांगांसाठी आदर्श ‘घरकुल’

वैशाली गायकवाड डोंबिवलीपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या खोणी गावात, एका सेवाभावी प्रयत्नातून साकारले

गरोदरपणातला मधुमेह

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा काळ असतो.

अंतरंगयोग- ध्यान

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके मागील लेखामध्ये आपण धारणा या अंतरंगयोगातील पहिल्या पायरीविषयी समजून घेतलं.

राखी परंपरेची आधुनिक रंगत

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर श्रावणातील महत्त्वाचा आणि सगळ्यांचा आवडता सण रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे बंधनाचं

जुळी गर्भधारणा आणि त्यातील आव्हाने

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील एक विशेष टप्पा असतो. यामध्ये जुळी बाळ होणे