Jyoti Malhotra : हेरगिर ज्योती मल्होत्राची डायरी पोलिसांच्या हाती, डायरीमध्ये मोठे खुलासे...

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्राची कसून चौकशीही सुरु आहे. दरम्यान ज्योती मल्होत्राची डायरी आता पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीत तिने पाकिस्तानला जाऊन आल्यानंतरचे काही माहिती दिली आहे.



ज्योती मल्होत्राची डायरी पोलिसांच्या हाती


ज्योती मल्होत्राची सुरक्षा यंत्रणांकडून कसून चौकशी केली जाते आहे. तिने पाकिस्तानला काय काय माहिती पुरवली आहे? हे जाणून घेतलं जातं आहे. दरम्यान पोलिसांना तिची एक डायरी मिळाली आहे. ही डायरी २०१२ चं कॅलेंडर असलेली आहे. डायरीमध्ये पाकिस्तानबाबत काय वाटतं ते ज्योतीने लिहिलं आहे. ज्योती म्हणते, हम सभी एक धरती, एक मिट्टी के बने हैं. पाकिस्तानात फिरण्यासाठी फारच कमी वेळ मिळाला असंही ज्योतीने लिहिलं आहे.





दिलों में जो गिले शिकवे हैं वो मिट जाएं...


ज्योती तिच्या डायरीत लिहिते, “सरहदो की दूरियां पता नहीं कबतक बरकरार रहेंगी, पर दिलों में जो गिले शिकवे हैं वो मिट जाएं” पाकिस्तान सरकारला मी विनंती करते की त्यांनी भारतीय लोकांसाठी गुरुद्वारे आणि मंदिरं खुली करावीत. त्यांनी तसं केलं तर पाकिस्तानात हिंदू जास्त प्रमाणावर येतील. तसंच १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी जे लोक वेगळे झाले आहेत असे लोक, अशी कुटुंबं एकत्र येण्यास मदत होईल. पाकिस्तान खूप सुंदर आहे. क्रेझी आणि कलरफुल असाही उल्लेख ज्योतीने केला आहे. आता या सगळ्यानंतर काय काय समोर येणार आहे ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.




ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला कशी माहिती पुरवते?


ज्योती मल्होत्रावर हेरगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या पोलीस चौकशीत नवनवे खुलासे समोर येत आहेत. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि स्नॅपचॅट सारख्या ॲप्सच्या माध्यमातून ती काही संवेदनशील माहिती पुरवत असल्याचा आरोप तिच्यावर आहे.




ज्योतीचा लॅपटॉप आणि फोनही रडारवर


“आम्ही ज्योती मल्होत्राचा लॅपटॉप आणि मोबाईल फोन आमच्या ताब्यात घेतला आहे. त्यांची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. तिनं नेमकी कोणती माहिती पाकिस्तानातील हस्तकांना दिली आहे, याचीही माहिती समोर येऊ शकेल. ज्योती पाकिस्तान दूतावास आणि पीआयओंच्या संपर्कात कशी आली? कुणी तिला मदत केली? याचीही चौकशी आम्ही करत आहोत. सायबर तज्ज्ञांचं एक पथक ज्योतीच्या सोशल मिडिया अकाऊंट्सचीही तपासणी करत आहेत.” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या