आजारपणाचे सोंग घेऊन विदेशवारी करणे पडले महागात

कामचुकार अधिकाऱ्यावर मंत्री नितेश राणे यांनी केली निलंबनाची कारवाई


मुंबई: आजारपणाच्या नावाखाली वैद्यकीय रजा घेऊन विदेशात मौजमजा करणे नाशिकच्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त प्र. दा. जगताप यांना चांगलेच महागात पडले आहे. वरिष्ठांची दिशाभूल करून देशात युद्धजन्य परिस्थिती असताना आजारपणाच्या नावाखाली विदेशात सैर करायला गेलेल्या सहाय्यक आयुक्त जगताप यांना तातडीने निलंबित करण्यातआले आहे.

राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यापूर्वीच कर्तव्यात कसूर केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्याच प्रमाणे देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या रजा रद्द करण्यात आल्या होत्या. तथापि शासकीय कामाकरता नाशिकचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप हे इगतपुरी न्यायालयात असताना त्यांची शुगर कमी झाल्यामुळे अशक्तपणा येऊन चक्कर आल्याचे व शुद्धीवर आल्यानंतर दवाखान्यात जावे लागल्याने नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाकडे अर्धा दिवस किरकोळ रजेचा अर्ज सादर करून तब्येत बरी नसल्याचे त्यांनी भासवले. मात्र प्रत्यक्षात ते विदेशवारी वर गेल्याचे निष्पन्न झाले.

या घटनेत जगताप यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, कर्तव्यात कसूर करणे, कार्यकर्त्यव्या वर गैरहजर असणे आणि वरिष्ठांची दिशाभूल केली असल्याचे स्पष्ट झाले. या सर्व गंभीर बाबी लक्षात घेऊन मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कारवाईचा बडगा उचलत मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त जगताप यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात आली. निलंबन आदेशात जगताप हे निलंबित असेपर्यंत मत्स्य व्यवसाय नागपूर प्रादेशिक उपायुक्त यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत. तसेच त्यांचे मुख्यालय चंद्रपूर हे राहील असेही स्पष्टपणे बजावण्यात
आले आहे.
Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील