मुंबई-गोवा महामार्गाचे कोलाड परिसरात काम संथगतीने सुरू

कोलाडमधील वाहतूक कोंडीमुळे व्यापारी त्रस्त, नागरिकांमध्ये संताप


कोलाड : मुंबई-गोवा महामार्गाचे (NH-६६) काम कोलाड परिसरात अत्यंत संथगतीने सुरू आहे. परिणामी, येथे दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून स्थानिक व्यापाऱ्यांना, दुकानदारांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना न केल्यास जनतेचा रोष उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोलाड गाव हे रोहा व पेण दरम्यान एक महत्त्वाचे स्थान असून येथे अनेक दुकाने, पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि उद्योगधंदे आहेत; परंतु सध्या चालू असलेले महामार्गाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने अनेक ठिकाणी अर्धवट उघडलेले रस्ते, खड्डे, अपूर्ण पुलांची कामे आणि दिशाहीन वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून ग्राहकांची संख्याही घटली आहे.



स्थानिक दुकानदारांनी सांगितले की,"रस्त्यावरील धूळ, गोंधळ आणि वाहतूक कोंडीमुळे ग्राहक दुकानात येणे टाळतात. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक दुकानदारांनी कर्ज काढून व्यवसाय उभा केला आहे, पण आता त्यांनी अडचणीत येण्याची वेळ आली आहे." महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका देखील प्रश्नचिन्हाखाली आहे. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत, पण अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. सध्या येणाऱ्या पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हा प्रशासनाकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आणि संबंधित ठेकेदारांकडे त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. वाहतूक नियंत्रित करणारे पोलिस, मार्गदर्शक फलक, पर्यायी मार्ग यांचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे. सर्वसामान्य जनतेला सहनशक्तीच्या बाहेरचा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कोलाडमधील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे हाल थांबवावेत, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.


Comments
Add Comment

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पेण दौरा रद्द

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या प्रचाराकडे सर्वच

सांडपाण्यामुळे कुंडलिका नदीचे पाणी प्रदूषित

रोहा : रोहा परिसरातील जीवनरेखा मानली जाणाऱ्या कुंडलिका नदीत धाटाव एमआयडीसी परिसरातून सोडल्या जाणाऱ्या

रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या

दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार