...आता मुंबईकरांना भाड्याचे घर सहज उपलब्ध होणार

म्हाडाचे लवकरच नवीन पोर्टल; मध्यस्थीशिवाय व्यवहाराचा म्हाडाचा प्रयत्न


मुंबई (प्रतिनिधी) : भाड्याने घर शोधणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आता भाड्याने घरे देण्यासाठी एक विशेष डिजिटल पोर्टल लवकरच सुरू करत आहे. या पोर्टलच्या माध्यमातून कोणताही ब्रोकर, कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट घरमालक आणि घर शोधणारा व्यक्ती यांच्यामध्ये व्यवहार घडवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. राज्यभरात मुंबईसह अनेक शहरांमध्ये लाखो लोक भाड्याच्या घरांमध्ये राहतात. पण घर मिळवणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही.


दलालांकडून फसवणूक, उंचावलेले भाडे, मोठे डिपॉझिट, आणि सुरक्षिततेचा अभाव अशा अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागते. विशेषतः विद्यार्थी, रुग्ण आणि म्हाडा MHADA मध्यमवर्गीय कुटुंबे यांच्यासाठी हे अधिकच अवघड ठरते. या पार्श्वभूमीवर म्हाडाने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'नो ब्रोकर' आणि 'मॅजिकब्रिक्स' सारख्या खाजगी पोर्टल्सच्या धर्तीवर म्हाडाचे हे पोर्टल काम करणार आहे, पण सरकारी खात्रीसह. या पोर्टलवर नागरिकांना त्यांच्या बजेटनुसार आणि पसंतीनुसार भाड्याने घर निवडता येणार आहे. फक्त एक नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून ही प्रक्रिया पार पडणार आहे.


यात विशेष म्हणजे, पोर्टलवर भाडेकरारनामा, पोलीस व्हेरिफिकेशन, ओळखपत्र पडताळणी अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. म्हणजेच भाडेकरूंना स्वतंत्रपणे कोणत्याही सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. हे सगळे काम पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे. म्हाडाने या उपक्रमासाठी स्वतंत्र धोरण म्हणजेच रेंटल हाऊसिंग पॉलिसी तयार करण्यास सुरुवात केली असून लवकरच त्याचा मसुदा तयार होणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या सूचना मागवून अंतिम धोरण प्रसिद्ध केलं जाईल.


हे पोर्टल केवळ म्हाडाच्याच नव्हे, तर एसआरए, सिडकोसारख्या अन्य सरकारी संस्थांची घरेही भाड्याने देण्यासाठी खुले असणार आहे. यासह एखाद्या बिल्डर किंवा सामान्य नागरिकालाही आपले घर भाड्याने द्यायचे असेल, तर तोदेखील हे पोर्टल वापरू शकतो. कॅन्सर रुग्ण, विद्याथ्यांसाठी काही महिन्यांसाठी घर हवं असेल, तरीसुद्धा इथे अल्प मुदतीसाठी घर उपलब्ध होणार आहे. एकंदरीत, घर भाड्याने घेणे ही एक डोकेदुखी न राहता, सुलभ आणि विश्वासार्ह प्रक्रिया बनावी हाच म्हाडाचा उद्देश आहे. हा उपक्रम यशस्वी झाला, तर घर शोधणाऱ्या लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.

३,१९० कोटींचे मालक अमिताभ बच्चन; पण संपत्तीचा वारस कोण? कोणाला किती मिळणार?

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनयाचेच नव्हे तर प्रचंड संपत्तीचेही बादशाह आहेत.

मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी, एकाला केले अटक

मुंबई : आज सर्वत्र अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2025) ची धामधूम असताना, मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर

लालबागचा राजाच्या मिरवणुकीपूर्वी दुर्दैवी घटना, मुख्य प्रवेशद्वारावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू

मुंबई: गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच