
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून कोकणामध्ये बुधवारसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे. राज्यात २२ मे पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, मात्र त्यानंतर पावसाला ब्रेक लागू शकतो अशी माहितीही हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

कल्याण : कल्याण पूर्वमधील श्रीसप्तश्रृंगी या चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची ...
हवामान विभागाकडून सातारा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आणि रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे या भागांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आजही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
मुंबईला पावसाने झोडपले ; अर्ध्या तासातच मुंबईकरांची उडाली दैना
पुण्यानंतर मुंबईत मान्सून पूर्व पावसाची एन्ट्री झाली आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक बरसलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारंबळ उडाली. अर्ध्या तासाच्या पावसाने मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत. काही भागात रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचले आहे. मात्र, या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. ढगाळ वातावरणामुळे मुंबईतील उकाड्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, मागील तासाभरापासून मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या दिलासा मिळाला. पश्चिम उपनगरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. मुंबईच्या दहिसर पूर्वएस वी रोड शिवाजी रोड पेट्रोल पंप परिसरातील रस्ते जलमय झाले. अर्ध्या तासांतच पावसामुळे रस्त्यावर दोन फुटापर्यंत पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरातील भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर या विभागात सरी बरसल्या. मान्सून पूर्व पावसातच अंधेरी मार्केट, कांदिवलीतील गांधी नगर भाजी बाजारात पाणी भरले. या पाण्यातच वाट काढत नागरिकांना घर गाठावे लागत आहे. मुंबई पश्चिम उपनगरमधील बांद्रा या विभागात पावसाला कोसळत आहे. या पावसामुळे अंधेरीतील सबवे बंद झाला. तर काही भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग
नवी मुबंईतील पनवेल परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. पनवेल, कळंबोली आणि खारघर परिसरात विजेच्या कडकडाटात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झालीय. तर नवी मुंबईतील बेलापूर, नेरुळ, वाशी परिसरात वीज चमकत मेघ गर्जनेसह पावसाच्या सरी बरसत आहेत.
कोकणात दरडी कोसळल्या
तळकोकणातही पावसाने धुव्वाधार बॅटींग केली असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला असून कोकण रेल्वेच्या अनेक गाड्या रेल्वे ट्रॅकवरच अडकून पडल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर वेरवली-विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळल्याने रेल्वेमार्ग बंद झाला आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे ट्रॅकवरच दरडी कोसळल्याने रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून होत्या. प्रशासनाकडून तातडीने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गोव्याच्या दिशेने नेत्रावती एक्सप्रेस रत्नागिरीत थांबून असून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेसही वैभववाडीत थांबून आहे, मुंबईकडे जाणारी तेजस एक्सप्रेस कणकवलीमध्ये थांबून होती. कोकणातील वैभववाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले असून काही प्रवाशी रेल्वेगाड्या ट्रॅकवरच असल्याने ताटकळत बसले आहेत.