Dhruv Rathi Controversy: युट्यूबर ध्रुव राठी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, नेमकं काय आहे प्रकरण

शीख गुरुंचा AI व्हिडिओ बनवल्याबद्दल, युट्यूबर ध्रुव राठी वादाच्या भोवऱ्यात 


नवी दिल्ली: हरियाणा येथील युट्यूबर ध्रुव राठीने (Dhruv Rathi) तयार केलेल्या एका व्हिडीओमुळे शीख समाज दुखावला गेला आहे. शीख गुरूंसंदर्भात ध्रुव राठीने तयार केलेल्या एआय व्हिडिओमुळे खरं तर हा वाद निर्माण झाला आहे.


ध्रुव राठीने 'द राईज ऑफ शीख' नावाचा एक एआय जनरेटेड व्हिडिओ तयार केला आहे आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे, ज्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पंजाबमध्ये याला मोठा विरोध होत आहे. शीख समुदाय याला शीख धार्मिक नेत्याचा अपमान म्हणत आहे. या कृत्याबद्दल ध्रुव राठीवर कारवाई करण्याची मागणी लोकांनी केली आहे. दिल्लीत डीएसजीपीसीने या संदर्भात पोलिस तक्रार दाखल केली आहे.


दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात एक मोठी पोस्ट लिहून याचा निषेध केला आहे. त्यांनी लिहिले की, "मी ध्रुव राठीच्या अलीकडील व्हिडिओ "द शीख वॉरियर हू टेररिफाईड द मुघल" चा निषेध करतो, जो केवळ तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचाच नाही तर शीख इतिहास आणि भावनांचाही त्याद्वारे घोर अपमान केला आहे.  धैर्य आणि देवत्वाचे मूर्त स्वरूप असलेल्या श्री गुरु गोविंद सिंग जी यांना बालपणी रडताना दाखवणे हे शीख धर्माच्या मूलभूत भावनेचा अपमान आहे."


ध्रुव राठीने त्याच्या यूट्यूब चॅनलवर 'द शीख वॉरियर हू टेररिफाईड द मुघल्स, लेजेंड ऑफ बंदा सिंग बहादूर' नावाचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये ध्रुव राठीने शीख गुरूंच्या हौतात्म्याबद्दल, मुघलांच्या अत्याचारांबद्दल आणि त्यांच्याशी झालेल्या युद्धांबद्दल माहिती दिली आहे. या माहितीपर व्हिडिओमध्ये गुरु तेग बहादूरजी यांचे हौतात्म्य, गुरु गोविंद सिंह यांचे खालसा पंथाची स्थापना, पंज प्यारे यांची निवड आणि त्यांच्या मुलांचे हौतात्म्य यांचा समावेश आहे.



का होत आहे विरोध? 


या व्हिडिओमध्ये गुरु गोविंद सिंहजींना एका लहान मुलाच्या म्हणजेच बालरूपात दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये ते त्यांचे वडील गुरु तेग बहादूर यांच्या हौतात्म्याचे साक्षीदार झाल्यानंतर रडताना दाखवण्यात आले आहे. शीख समुदायाच्या लोकांच्या मते, हा एक अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. आणि राठी यांनी असे दाखवून शीख धर्माचा अपमान केला असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.



ध्रुव राठीने दिले स्पष्टीकरण


वाद वाढत असताना, ध्रुव राठीने एका व्हिडिओद्वारे आपली बाजू स्पष्ट केली आहे. ज्यात त्याने सांगितले की, हा व्हिडिओ अनेकांना आवडला, परंतु शीख समुदायातील काही लोकांचा असा विश्वास आहे की शीख गुरूंना एनिमेशनद्वारे दाखवणे चुकीचे आहे. गुरु गोविंद सिंहजींना असे दाखवणे योग्य नाही. कोणत्याही शीख गुरूच्या कथेवर फोटोशिवाय व्हिडिओ बनवणे शक्य नाही. लोक मला सोशल मीडियावर त्यांचे मत देऊ शकतात. यानंतर मी व्हिडिओ डिलीट करेन किंवा इतर काही गोष्टी करेन.


Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन