मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये १८ टक्केच पाणीसाठा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांची पातळी साठवण क्षमतेच्या १८ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. मुंबईकरांना पुढील ६० दिवस पाणीपुरवठा करता येईल, इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. पंरतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा टक्के अधिक आहे.


मुंबई महानगरपालिका परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या सात तलावातून दररोज ३ हजार ९५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे.


दरम्यान, तानसा, मध्य वैतरणा, भातसा आणि अप्पर वैतरणा या प्रमुख पुरवठा तलावांमधील पाण्याची पातळी २० टक्क्यांपेक्षा कमी झाली. बीएमसीने अप्पर वैतरणा आणि भातसा येथून १.८१ लाख दशलक्ष लिटरच्या राखीव साठ्यातून पाणी काढण्यासाठी राज्य सरकारची मान्यता मिळवली आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, मुंबईकरांना जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, एक टक्के पाणीसाठा सुमारे तीन दिवस पुरतो. दरम्यान, गेल्या वर्षी मे महिन्यात पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्याने ५ जून २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात करण्यात आले होते.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल