Sunday, August 3, 2025

धुळे शहरात सरकारच्या फाईली रस्त्यावर, वळवाच्या पावसाने उडवली दाणादाण

धुळे शहरात सरकारच्या फाईली रस्त्यावर, वळवाच्या पावसाने उडवली दाणादाण

नाशिक: राज्यातील अनेक जिल्ह्यात काल रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा नशिकमधील अनेक मोठ्या शहराला मोठ्या प्रमाणावर फटका बसला, अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी साचलेले पाहायला मिळाले. दरम्यान धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयात देखील पावसाचे पाणी शिरल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईली भिजल्या, ज्या सुकवण्यासाठी रस्त्यावर वाळत घालण्याची नामुष्की कर्मचाऱ्यांवर ओढावली.


काल रात्री झालेल्या वळवाच्या पावसाने धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयात पाणीच पाणी झाले.  या पावसाने शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दाणादाण उडवून दिली असून, ज्यामध्ये महत्त्वाच्या फाईली भिजल्या. त्या सर्व फाईली कार्यालयासमोरील पटांगणात उन्हात वाळू घातल्याचं पाहायला मिळत आहे.  एका अवकाळी पावसामुळे कार्यालयाला लागलेली गळती लक्षात घेता,  त्याच्या दुरुस्तीची गरज व्यक्त होत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्याचंही म्हटलं जात आहे.



शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची मागणी 


शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे.



राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात


राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडेल असे हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून मराठवाडा भागात पाऊस सुरु, होईल असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची  रिपरिप सुरु आहे. सोमवारी पहाटेपासूनही मुंबईत पावसाच्या सरी बरसत आहेत.   या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment