Crime News: किरकोळ कारणांवरून काढले कोयते! दहिसरमध्ये दोन कुटुंबांत तुफान हाणामारी; ३ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

मुंबई: दहिसर पश्चिमेतील गणपत पाटील नगर झोपडपट्टीत रविवारी दोन कुटुंबांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून तुफान हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला या मध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


प्राथमिक माहितीनुसार, राम गुप्ता (५०) यांच्या नारळ विक्रीच्या स्टॉलजवळ हमीद शेख (४९) मद्यधुंद अवस्थेत आले आणि किरकोळ वाद झाला. वाद लवकरच हिंसक वळणावर गेला आणि दोन्ही कुटुंबांचे सदस्य एकमेकांवर तुटून पडले. या वादात राम गुप्ता, त्यांचा मुलगा अरविंद गुप्ता (२३) आणि हमीद शेख गंभीर जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या वादात अमर गुप्ता, अमित गुप्ता, अरमान शेख आणि हसन शेख हे चार जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमएचबी पोलिसांनी परस्परविरोधी खुनाचे गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, गुप्ता आणि शेख कुटुंबांमध्ये मागील दोन वर्षांपासून वाद सुरू होता. जुन्या वैरातूनच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. परिसरात तणावाचे वातावरण असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड