अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला Covid-19 ची लागण, पोस्ट शेअर करत दिली माहिती

  69

मुंबई: कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट जगभरात  थैमान घालताना दिसत आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असून,  बॉलिवूडच्या कलाकारांनाही त्याची लागण होताना दिसून येत आहे. कारण यापूर्वी नोरा फतेही,  अर्जुन कपूर नंतर आता अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला (Shilpa Shirodkar tests positive for COVID-19) ही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शिरोडकरने याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

अलीकडेच हिंदी 'बिग बॉस'मध्ये झळकलेल्या शिल्पा शिरोडकरने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तिने कोरोनाची चाचणी केली होती, जी पॉझिटिव्ह आली. तसेच ती गेली चार दिवस क्वारंटाईनमध्ये असल्याचे देखील तिने सांगितले.

मास्क घालण्याचे केलं आवाहन 





शिल्पा शिरोडकरने पोस्ट शेअर करताना लिहिले की, 'नमस्कार मित्रांनो! माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तुम्ही सर्वजण सुरक्षित राहा आणि मास्क घाला." शिल्पाच्या या पोस्टवर लोक कमेंट करत आहेत आणि तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

शिल्पा ही तेलगू सुपरस्टार महेश बाबू याची मेहुणी आणि नम्रता शिरोडकरची बहीण आहे. शिल्पाने काही बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील कामं केली आहेत.

सिंगापूरमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली


सिंगापूरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. असे असले तरी, सध्या देशात पसरणारा प्रकार मागील प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य नाही. आरोग्य मंत्रालय (MOH) आणि संसर्गजन्य रोग एजन्सी (CDA) यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, २७ एप्रिल ते ३ मे २०२५ दरम्यान कोविड-१९ चे सुमारे १४,२०० नवीन रुग्ण आढळले, जे मागील आठवड्यात सुमारे ११,१०० इतके होते.
Comments
Add Comment

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९